Vastu Shastra: या 3 गोष्टी वांरवार तुमच्यासोबत घडत असतील, तर समजून जा लवकरच नशीब फळफळणार, तिसरी तर आहे खूपच खास
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तु अर्थात घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, सोबतच तुम्हाला जर एखादं स्वप्न पडलं किंवा एखादी घटना तुमच्यासोबत वारंवार जर घडत असेल तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो, याबद्दल देखील माहिती सांगण्यात आली आहे.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, एवढंच नाही तर आपल्या काही छोट्या -छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, वास्तुदोषामुळे घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान अशा काही घटना असतात ज्या वारंवार तुमच्यासोबत घडतात, अशा घटनांचा नेमका अर्थ काय? कोणत्या घटना या शुभ असतात, आणि कोणत्या घटना या अशुभ असतात, याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही घटना सांगितल्या आहेत, ज्या वारंवार तुमच्यासोबत घडत असतील तर समजून घ्या लवकरच तुमचं नशीब बदलणार आहे, अशा कोणत्या घटना आहेत? आणि त्याचा नेमका काय अर्थ होतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
गाय दारात येणं – वास्तुशास्त्रानुसार जर वारंवार गाय तुमच्या दारात येत असेल तर हा खूप शुभ संकेत असतो. गाय दारात येणं म्हणजे लवकरच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो, त्यामुळे गाय दारात आल्यास तिला काही तरी खायला द्या, उपाशीपोटी पाठवू नका असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
स्वप्नात कमळ येणं – वास्तुशास्त्रानुसार जर वारंवार तुमच्या स्वप्नात कमळ येत असेल, तर हे खूपच शुभ चिन्ह आहे. लवकरच तुमचं आयुष्य बदलणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. जर तुमच्या स्वप्नात वारंवार कमळ येत असेल तर लवकरच तुमचं घर पैशांनी भरून जाणार आहे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घराच्या अंगणात पोपट येणं – जर तुमच्या घराच्या अंगणात वारंवार पोपट येतील असतील, तर हे एक शुभ चिन्ह आहे, त्यांना दाणे टाका, पाणी पाजा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
