Vastu Shastra : घराच्या पश्चिम दिशेला करा फक्त हे दोन बदल, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
वास्तुशास्त्रमध्ये असे अनेक सोपे-सोपे उपाय सांगितले आहेत, जे तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा खूपच चांगला प्रभाव हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडतो.

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्यावर तर होतोच, मात्र तुमच्या कुटुंबावर देखील होतो, घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरात कायम आर्थिक अडचणी येणं, आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होणं, काहीही कारण नसताना देखील गृह कलह वाढणं , अशा अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? इथपासून ते घरात काय नसावं? इथपर्यंत सर्वच गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, अशाच काही उपयांबाबत आज आपण जाणून घेणार आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची पश्चिम दिशा ही अतिशय महत्त्वाची मानण्यात आली आहे.
तुमच्या घराची पश्चिम दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते. घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहावी यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीला पांढरा किंवा सोनेरी कलर द्यावा असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. यासोबतच तुमच्या मुलाच्या अभ्यासासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत, त्या देखील तुम्ही पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं, पश्चिम दिशा ही वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र दिशा मानली गेली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या देवघराचं मुख्य द्वार देखील पश्चिम दिशेला करू शकता.
वास्तुशास्त्रामध्ये घराच्या पश्चिम दिशेला महत्त्वाचं मानण्यात आलं आहे, वास्तुशास्त्रानुसार घराची पश्चिम दिशा ही शनिची दिशा असते, त्यामुळे या दिशेला कधीही तुटलेलं आणि भंगार सामान ठेवू नये, घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, त्यामुळे तुम्हाला शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्या पाठीमागे असलेली सर्व साडेसाती नष्ट होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे फेंगशुई आणि वास्तुशास्त्र अशा दोन्ही शास्त्रानुसार घरातील पश्चिम दिशा अत्यंत शुभ मानण्यात आली आहे, तुम्ही काही सोपे उपाय करून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
