AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रातील हे तीन सोपे उपाय कराच

अनेकांसोबत असं होत की, कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. कायम पैशांची चणचण भासते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का असं कशामुळे होत असेल? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रातील हे तीन सोपे उपाय कराच
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 8:30 PM
Share

अनेकांसोबत असं होतं की, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे लगेच खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं असतं. अनेक लोक जाणीवपूर्वक पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये त्यांना यश येत नाही. पैशांची बचतच होत नाही. असं का घडत असेल? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे. तर त्यामागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो.  त्याबाबतच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तुदोष नेमका कशामुळे तयार होतो?  

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो. उदाहरण द्यायचं झालं तर वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तुंची दिशा ही ठरलेली असते. जर त्या -त्या दिशेला ती -ती वस्तू ठेवली गेली नाही तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, की देवाचा फोटो कधीही दक्षिण दिशेला नसावा, मात्र अनेकजण देवी देवतांचे फोटो हे नकळत दक्षिण दिशेला लावतात. तसेच आपल्या पूर्वजांचे फोटो हे दक्षिण दिशा सोडून इतर दिशांना लावू नये, असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, परंतु ते अनेकदा इतर ठिकाणी लावले जातात. अशा चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा अशा घरात कधीही पैसा टिकत नाही, आज आपण वास्तुदोष दूर करण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत.

जर तुमच्या घरात पैसा टिकत नेसल तर तुम्ही तुमच्या पाकिटात नेहमी काही लवंगा ठेवू शकता. यामुळे तुमच्याभोवती जी नकारात्मक शक्ती असते ती दूर होण्यास मदत होते, त्याचा तुम्हाला फायदा होतो.

जर तुम्हाला पितृदोष असेल तरी देखील तुमच्या घरात पैसा टिकत नाही, पितृदोष दूर करण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले विविध उपाय तुम्ही करू शकतात.

या उपायांसोबतच अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा