AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल

अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड मेहनत करतात, खूप पैसा कमावतता. परंतु त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतात. ते दूर करण्यासाठी वस्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 5:51 PM
Share

अनेकांसोबत असं घडतं की, ते लोक प्रचंड मेहनत करतात. दिवसरात्र कष्ट करतात. खूप धन कमावतात. परंतु त्यांच्या हातात पैसे टिकत नाहीत. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामे असते. त्यामागे विविध कारणे असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुमच्या घरात ही समस्या निर्माण होते. तुमच्या घरात पैसा टिकत नाही. घरात पैसा टिकण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

घराची उत्तर दिशा – तुमच्या घराची उत्तर दिशा ही सर्वात महत्त्वाची असते, या दिशेला धनाची दिशा देखील म्हटलं जातं. त्यामुळे या दिशेला जर काही वास्तुदोष असेल तर त्यामुळे धन प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात. या दिशेचा दोष दूर करणं गरजेचं असतं. तसेच ही दिशा धनाची देवता कुबेर यांची देखील आवडती दिशा आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला नेहमी कुबेरांचा फोटो लावावा, तसेच उत्तर दिशेला कोणत्याही प्रकारची अडचण असू नये, रद्दी किंवा अवजड सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घरात लक्ष्मी मातेचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो असावा. लक्ष्मी मातेची दररोज पूजा ही झालीच पाहिजे, तसेच लक्ष्मीमातेला दररोज एक लाल फूल किंवा झेंडूचं फूल अर्पण करावं, यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात.

संधैव मिठाचा उपाय – वास्तुशास्त्रामध्ये संधैव मिठाला प्रचंड महत्त्व आहे. दररोज सकाळी संधैव मीठ मिश्रीत पाण्याने घराचा उंबरा हा पुसून घ्यावा, त्यामुळे घराला बरकत प्राप्त होते, सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)  

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा