AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंची हवा, अभिनेत्रीला हॉटेलात आला असा अनुभव की…म्हणाली आता भीतीच संपली!

गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तुकाराम मुंढेंच्या कारवाईबाबतचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.

तुकाराम मुंढेंची हवा, अभिनेत्रीला हॉटेलात आला असा अनुभव की...म्हणाली आता भीतीच संपली!
| Updated on: Aug 30, 2026 | 5:33 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त आणि कारवाईसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या कारवाईच्या संदर्भातून रवीना टंडनने सांगितलेला रेस्टॉरंटमधील मजेशीर किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली रेस्टॉरंट्सची तपासणी आणि नियमांचे पालन याबाबत सुरू असलेल्या कारवाईवर या लेखातून भाष्य करण्यात आले आहे.

एका कॉलममध्ये रवीना टंडनने रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. त्या आणि त्यांच्या मित्रांनी रेस्टॉरंटमध्ये तंदुरी ब्रोकोली आणि चिकन टिक्का ऑर्डर केले. त्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला, मुंढे यांनी तुमच्या रेस्टॉरंटची तपासणी केली आहे का? असा प्रश्न विचारला.

यावर कर्मचाऱ्याने होकार देत, मुंढे यांनी मागील आठवड्यात रेस्टॉरंटची तपासणी केली होती आणि रेस्टॉरंट नियमांच्या कसोटीवर पात्र ठरल्याचे सांगितले. त्यानंतर रवीना टंडनने विनोदाने पनीर टिक्का ऑर्डर करण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला.

‘मुंढेची मार्टिनी’

यानंतर ड्रिंक्स आणि स्टार्टर टेबलवर आले. लेखिकेने पनीरचा तुकडा टूथपिकने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तोंडापर्यंत पोहोचण्याआधीच खाली पडून तिच्या मार्टिनी ग्लासमध्ये गेला. हा प्रसंग पाहून तिने सुरुवातीला नवीन ड्रिंक मागण्याचा विचार केला; मात्र त्याऐवजी या अनपेक्षित प्रसंगाला विनोदी स्वरूप देत तिने त्या पेयाला ‘मुंढेची मार्टिनी’ असे नाव दिले.

‘जिन, व्हर्माउथ, ऑलिव्ह आणि पनीर’ अशा मजेशीर शब्दांत या नव्या ‘कॉकटेल’चं वर्णन करत रवीना टंडनने हा किस्सा शेअर केला. या प्रसंगाला उपस्थित असलेल्या @anudewan5, @taniadeol आणि @lailabijlani तिघींना तिने सोशल मीडियावर टॅगही केले आहे.

पुढे कोणत्या सरकारी विभागात सुधारणा होण्याची गरज

या हलक्याफुलक्या किस्स्याबरोबरच रवीना टंडनने तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावरही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. एखादा सरकारी अधिकारी आपले नियमित कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असेल, तर ते इतके दुर्मीळ आहे का की त्याची बातमी व्हावी? तसेच पुढे कोणत्या सरकारी विभागात सुधारणा होण्याची गरज आहे, असा सवालही तिने वाचकांना केला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या शिस्तप्रिय आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या प्रतिमेमुळे हा लेख चर्चेत आला आहे. रेस्टॉरंटमधील एका मजेशीर प्रसंगातून सुरू झालेला हा किस्सा पुढे सरकारी यंत्रणा, नियमांचे पालन आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर भाष्य करणारा ठरला आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट