AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी डुप्लिकेट नितेश राणे थेट अंतवाली सराटीत, नेमकं प्रकरण काय?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून, आंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी डुप्लिकेट नितेश राणे थेट अंतवाली सराटीत, नेमकं प्रकरण काय?
Dinesh PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 5:17 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असतल्याचं पहायला मिळत आहे. राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये आले आहेत. मात्र सध्या चर्चा सुरू आहे, ती म्हणजे डुप्लिकेट नितेश राणेंची हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डुप्लिकेट नितेश राणे अंतरवाली सराटीमध्ये आले आहेत. हुबेहूब नितेश राणे यांच्या सारखे दिसणारे मराठा बांधव दिनेश पवार हे देहूवरून थेट अंतरवालीमध्ये दाखल झाले  आहेत.

दिनेश पवार हे मराठा बांधव हुबेहुब नितेश राणे यांच्यासारखेच दिसत असल्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. नितेश राणे यांना भेटलो तर त्यांना नक्कीच मराठा समाज बांधवांच्या मागण्या संदर्भात बोलू असं यावेळी दिनेश पवार यांनी म्हटलं आहे.  अनेकजण तर त्यांना राणे साहेब नावाने हाक मारत असल्याचं देखील पहायला मिळत आहे.

मनोज जरांगे पाटलांकडून मुंबईत येण्याचा इशारा  

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकारला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. जर येत्या 15 दिवसांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास बारा संप्टेबर रोजी महाराष्ट्रातील मराठा बांधवांची बैठक घेऊ आणि मुंबईला जाण्याची घोषणा करू, मी पुन्हा मुंबईमधून माघारी येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता या आंदोलनावर सरकार कसा तोडगा काढणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आज परभणीमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा होत आहे, या मेळाव्यावरून देखील मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?