Vastu Shastra : हे 6 प्राणी असतात शुभ, झोपेतून उठताच दिसल्यास आयुष्यच बदलून जातं
वास्तुशास्त्रामध्ये जशी काही झाडं आणि रोपं ही शुभ मानण्यात आली आहेत, तसेच काही प्राणी देखील शुभ मानण्यात आले आहेत. जर सकाळी -सकाळी हे प्राणी तुमच्या दृष्टीस पडल्यास तुमचं भाग्य उजळण्याचे ते संकेत असतात. अशाच काही प्राण्यांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही घरात लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, अशी झाडं जर तुम्ही घरात लावली तर त्याचा अत्यंत शुभ परिणाम हा तुमच्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होतो. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये जशी काही झाडं ही शुभ मानण्यात आली आहेत, त्याच प्रकारे काही प्राणी देखील शुभ मानण्यात आले आहेत. तुम्ही झोपेतून उठल्यानंतर हे प्राणी जर तुमच्या नजरेस पडले, तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा दिवस हा खूपच शुभ जाणार आहे, तुम्हाला दिवसभरात एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे, त्यामुळे अनेक लोक तर असे प्राणी आपल्या घरी सुद्धा पाळतात. वास्तुशास्त्रानुसार असे प्राणी दिसणं म्हणजे भविष्यात तुमच्यासोबत एखादी चांगली घटना घडणार आहे, याचे ते संकेत असतात. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे त्याबद्दल.
हत्ती – वास्तुशास्त्रानुसार हत्तीला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. हत्ती हे जंगलात राहतात. त्यामुळे ते सहजपणे कोणाच्या दृष्टीला पडत नाहीत, परंतु जर तुमच्या दिवसाची सुरुवात ही हत्तीच्या दर्शनाने झाली तर तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. सकाळी -सकाळी हत्ती दिसणं याचा अर्थ दिवसभरात तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.
घोडा – घोडा हा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ प्राणी आहे, झोपेतून उठल्यानंतर जर सर्वात आधी तुम्हाला घोडा दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत, तुमचं नशीब घोड्या सारखं धावणार आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं.
कासव – कासवाला देखील वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, कासवाला पाळायला बंदी असल्यानं अनेक जण आपल्या घरात कासवाची चांदीची किंवा पितळाच्या धातुची मूर्ती ठेवतात. ज्या घरात कासवाची मूर्ती असते, त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नष्ट होतात.
गाय – गायीला देखील वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे जेव्हा देखील गाय आपल्या दारात येते, तेव्हा तिला उपाशीपोटी पुढे पाठवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं.
मासे – वास्तुशास्त्रात मासे देखील शुभ मानले गेले आहेत, त्यामुळे अनेक जण आपल्या घरात मासे पाळतात. ज्या घरात मासे असतात त्या घरातील वास्तुदोष नष्ट होतो, असं मानलं जातं.
मुंगूस – मुंगसाला देखील वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, जर सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुंगूस दिसलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
