Vastu Shastra : ही चूक पडू शकते महागात, कायम आजारी राहाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार घरात गोळ्या औषधं कुठे ठेवावीत? याची देखील एक निश्चित अशी दिशा असते, जर तुम्ही तुमच्या घरातील गोळ्या औषध हे चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवले, तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होतो.

आजच्या काळातील जीवन हे अत्यंत धावपळीचं आहे, गतिमान जीवनशैलीमुळे आपण नकळत अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. कामाचा व्याप नोकरीमधील ताण तणाव यामुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी आपण अनेकदा आजारी पडतो. सध्या अनेक जण घरी बनवलेलं सकस अन्न खाण्याऐवजी फास्ट फूड खाणे पसंत करतात, त्यामुळे देखील अनेक आजार होऊ शकतात. मात्र याही व्यतिरिक्त आणखी एक कारण म्हणजे जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला, तरी देखील तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याचा केवळ तुमच्या एकट्यावरच परिणाम होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरातील कोणती न कोणती व्यक्ती कायम आजारी राहते. अशा प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
औषधी कुठे ठेवावीत? वास्तुशास्त्रानुसार घरातील औषधं ठेवण्याची देखील एक निश्चित जागा असते. अनेकदा आपण काय करतो की आपल्या गोळ्या औषध घेण्यासाठी सोईची जावीत म्हणून ती आपल्या उशीखाली ठेवतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं म्हणजे आजारांना आणखी आमंत्रण देणं आहे, यामुळे तुमच्या घरातील आजार कमी होण्याऐवजी वाढतात, त्यावर प्रचंड प्रमाण पैसा खर्च होतो.
अग्नेय दिशा – वास्तुशास्त्रानुसार जसं औषधं ही उशीखाली ठेवू नयेत, त्याचप्रमाणे औषधं ही कधीही अग्नेय दिशेला ठेवू नयेत. यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. घरातील आजारपण कमी होत नाही. तुम्हाला कायम आजारी असल्याचा भास होऊ शकतो. त्यामुळे अग्नेय दिशेला औषधी ठेवणं टाळावं.
वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जेवढी आवश्यक आहेत, तेवढीच औषधं घरात आणावीत. त्यापेक्षा जास्त औषधी घरात आसू नयेत, तसेच औषधी ही नेहमी ईशान्य दिशेला ठेवावीत. त्यामुळे घरातील आरोग्य सुधारण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
