Vastu Shastra : ऑफिसमध्ये कोणत्या देवी-देवतांचे फोटो असावेत? वास्तुशास्त्र काय सांगतं?
घरात आणि ऑफिसमध्ये देवतांचे फोटो असणं शुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि त्याचा परिणाम हा आपल्यावर होतो. मात्र काही देवी -देवतांचे फोटो किंवा मूर्ती अशा असतात, ज्या योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोषासंबंधी उपाय सांगण्यात आले आहेत, जर आपण हे उपाय केले तर घरातील वास्तुदोष दूर होतो, घरात आनंदाचं वातावरण राहतं, सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये देवी देवतांचे फोटो लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. मात्र देवी, देवतांचे फोटो लावताना नेहमी एक काळजी घ्यावी लागते, योग्य ठिकाणी व योग्य दिशेला देवी-देवतांच्या प्रतिमा लावल्या गेल्या पाहिजेत. काही देवतांच्या दिशा या ठरलेल्या असतात. जसं की तुम्ही जर उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावला तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, तुम्ही जर कर्जबारी असाल तर कर्ज देखील लवकर फिटतं आणि अनावश्यक खर्च कमी होऊन पैशांची बचत होते. ज्याप्रमाणे माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे, त्याचप्रमाणे कुबेर हे देखील धनाची देवता आहे. उत्तर ही कुबेराची आवडती दिशा असते, त्यामुळे कुबेराचा फोटो हा नेहमी उत्तर दिशेला असावा. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार कधीही घराच्या दक्षिण दिशेला देवी देवतांचे फोटो लावू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. आज आपण ऑफीसमध्ये कोणत्या देवी देवतांचे फोटो लावू शकतो, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
गणपतीचा फोटो – गणपती ही बुद्धीची देवता आहे, तसेच गणपती आपल्या भक्तांवर आलेले सर्व प्रकारची संकट दूर करतो. त्यामुळे ऑफिसमध्ये गणपतीचा फोटो लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही ऑफिसमध्ये जिथे बसता त्याच्या पश्चिम बाजुला गणपतीाचा फोटो किंवा मूर्ती असावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर ऑफिसमध्ये गणपतीचा फोटो असेल तर तुमच्यावरील सर्व संकटं दूर होतात, नोकरीत प्रगती होते, आर्थिक भरभराट होते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
लक्ष्मी मातेचा फोटो – ऑफिसमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो देखील लावू शकता. लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुम्हाला नोकरीत उत्तम यश मिळतं, तुमची प्रगती होते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो. ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र लक्ष्मी मातेचा फोटो ऑफिसमध्ये लावताना नेहमी एक काळजी घ्यावी तो कधीही अंधाऱ्या जागेत लावू नये.
सरस्वती मातेचा फोटो – तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये देवी सरस्वती मातेचा फोटो देखील लावू शकता, सरस्वती मातेला ज्ञानाची देवी म्हटलं जातं. जर तुमच्या ऑफिसमध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नोकरीमध्ये प्रगती होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)