Vastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते

रोज सकाळी आपण एक नवीन आशा घेऊन उठतो (Vastu Tips). मान्यता आहे की जर आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जाईल. परंतु बर्‍याच वेळा आपण अशा गोष्टी पाहतो ज्या पाहिल्याने आपले कार्य खराब होऊ शकते. वास्तुशास्त्रात या गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे. या गोष्टी सकाळी उठल्यावर पहाणे अशुभ मानले जाते

Vastu Tips | सकाळी उठल्यावर चुकूनही या वस्तू पाहू नये, नुकसान होऊ शकते
Vastu Tips
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 21, 2021 | 12:58 PM

मुंबई : रोज सकाळी आपण एक नवीन आशा घेऊन उठतो (Vastu Tips). मान्यता आहे की जर आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जाईल. परंतु बर्‍याच वेळा आपण अशा गोष्टी पाहतो ज्या पाहिल्याने आपले कार्य खराब होऊ शकते. वास्तुशास्त्रात या गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे. या गोष्टी सकाळी उठल्यावर पहाणे अशुभ मानले जाते (Vastu Tips Do Not Look Into These Things First In Morning Will Spread Negativity And Depression ).

💠 सकाळी तुटलेली भांडी, बंद घडी आणि कोणताही अपघात पाहणे अशुभ मानले जाते. या गोष्टी पाहिल्यामुळे, आपला संपूर्ण दिवस तणावपूर्ण जातो. या दिवशी कोणताही निर्णय घेण्याचे टाळले पाहिजे.

💠 सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये आपला चेहरा पाहणे अशूभ आहे. यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जातो. जेव्हा आपण दररोज सकाळी उठता तेव्हा आपले हात एकदा पहा. मान्यता आहे की याने आपला दिवस चांगला जातो.

💠 मान्यता आहे की सकाळी तेलाचे भांडे, सुई-धागा इत्यादी पहाणे अशुभ आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या व्सतू अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी उठल्यावर तुमची नजर जाणार नाही

💠 वास्तुनुसार, सकाळी सावली पाहणे अशुभ आहे. उगवत्या सूर्याकडे पहात असताना जर आपली छाया पश्चिम दिशेने पाहिली तर ते एक अशुभ संकेत आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात राहू दोष आहे.

💠 वास्तुनुसार सकाळी उठून खरकटी भांडी पाहणे चांगले नाही. रात्री झोपण्यापूर्वी खरकटी भांडी स्वच्छ करा. यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही.

💠 सकाळी उठल्याबरोबर जंगली प्राणी पाहू नये. याशिवाय, पाळीव प्राणी पाहणे देखील चांगले नाही. तुम्ही सकाळी उठून सूर्याचे दर्शन करा आणि चांगल्या दिवसासाठी प्रार्थना केली पाहिजे. जर तुम्ही सूर्योदय होण्यापूर्वी उठलात तर चंद्र पहा.

Vastu Tips Do Not Look Into These Things First In Morning Will Spread Negativity And Depression

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें