Vastu Tips | घराच्या आसपास ही झाडं कधीही लावू नये, अन्यथा समस्यांना तोंड द्यावं लागेल

वास्तुशास्त्रात (Vastushastra) व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या आसपासच्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घराचे किंवा आजूबाजूचे वातावरण वास्तुनुसार असेल तर ते सर्व दृष्टीकोनातून शुभ असते. वास्तूनुसार, झाडे देखील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

Vastu Tips | घराच्या आसपास ही झाडं कधीही लावू नये, अन्यथा समस्यांना तोंड द्यावं लागेल

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastushastra) व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या आसपासच्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घराचे किंवा आजूबाजूचे वातावरण वास्तुनुसार असेल तर ते सर्व दृष्टीकोनातून शुभ असते. वास्तूनुसार, झाडे देखील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

तुळशीचे रोप हे सकारात्मक उर्जेचे सर्वात मोठं उदाहरण आहे. याशिवाय, कडुलिंब, मनी प्लांट इत्यादी देखील शुभ मानले जातात. याचे वर्णन वास्तुशास्त्रात आहे. याशिवाय, घरामध्ये किंवा आजूबाजूला काही झाडे असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती झाडे कोणती जाणून घ्या –

काटेरी झाड

वास्तुशास्त्रानुसार घराच्या अंगणात किंवा आसपास कोणत्याही प्रकारचे काटेरी झाड किंवा रोप लावल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तत्सम काटेरी झाडे घरात किंवा आजूबाजूला लावू नयेत. कारण त्याच्या नकारात्मक उर्जेमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात दुरावा वाढतो.

चिंचेचं झाड

चिंच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असली तरी वास्तुच्या दृष्टीने ती अशुभ आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला चिंचेचे झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरातील सदस्य अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त असतात. याशिवाय, घरातील सदस्यांमध्ये परस्पर वैमनस्यही कायम आहे.

पिंपळाचं झाड

सामान्यतः पिंपळ हे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते. पण, याचा वापर घरात करु नये असे वास्तू तज्ञ सांगतात. यासोबतच पिंपळाचे झाड घराच्या आपसाप लावणेही टाळावे. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे मानले जाते.

संबंधित बातम्या :

Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार

Brahmasthan : घरात ब्रह्मस्थान गरजेचं का असते, जाणून घ्या त्याबाबतचे वास्तू नियम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI