घरातील या 5 ठिकाणी दिवा लावा; नक्कीच घरात फरक दिसेल
घरातील अशा 5 ठिकाणी दिवा लावा ज्यामुळे घरात सकारात्मकता येईल आणि अनेक अडचणी, समस्याही दूर होतील असं म्हटलं जातं. तसेच हा उपाय तुम्ही रोज करू शकता किंवा आठवड्यातून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करू शकता.

घरातील वातावरणात सकारात्मकता यावी यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान देव उठाणी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरासाठी काही दिव्याचे उपाय केले तर नक्कीच चांगलं फळ मिळेल. दरम्यान हे दिव्यांचे उपाय फक्त याचं दिवशी नाही तर रोज जरी केले तरी देखील जीवनात आणि घरात सकारात्मक बदल नक्कीच होतील. घरात या 5 ठिकाणी नक्की दिवे लावा.
घरातील मंदिरात दिवा
सगळ्यात पवित्र जागा म्हणज घरातील देव्हारा. घरतील देवघरात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे नक्कीच घरात एक सकारात्मकता पसरते.
तुळशीच्या रोपाजवळ
तुळशीमातेजवळ पाच तुपाचे दिवे लावा. तुळशीला लक्ष्मी आणि हरिप्रियाचे प्रतीक मानले जाते. तुळशीमातेजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी येते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना गायीच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवा घरासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतो. तो सकारात्मक उर्जेचा प्रवाह राखतो आणि वाईट नजर किंवा कोणत्याही नकारात्मक शक्तीचा त्यावर परिणाम होण्यापासून रोखतो. व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी हा उपाय नक्कीच करून पहावा.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याला सात वेळा प्रदक्षिणा घाला. कर्ज किंवा आर्थिक समस्यांशी झुंजणाऱ्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर मानला जातो. तसेच आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतात.
स्वयंपाकघरात दिवा
स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णाचे निवासस्थान मानले जाते. म्हणून, देवुथनी एकादशीला स्वयंपाकघरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. या विधीमुळे कुटुंबात समृद्धी आणि आनंद येतो.
अशापद्धतीने तुम्ही हा उपाय 1 नोव्हेंबर 2025 रोजी करूच शकता पण रोज केला तरी त्याचा चांगला फरक नक्कीच दिसून येईल
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
