Vastu Tips : झोपताना थोडसं मीठ तुमच्या उशीखाली ठेवा अन् चमत्कार बघा, आहेत फायदेच फायदे
मिठाचा वापर आपण दररोज करतो, जर खाद्यपदार्थांमध्ये मीठ नसेल तर ते बेचव बनतील, परंतु या व्यतिरिक्त देखील मिठाचे अनेक फायदे आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मिठाचा वापर आपण आपल्या जीवनात दररोज करतो. खाण्यामध्ये जर मीठ नसेल तर तुम्ही ते अन्न खाऊ शकणार नाहीत, कारण त्याची तुम्हाला चवच लागणार नाही. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? की मीठ तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी देखील मदत करू शकतं? प्रसिद्ध लाइफस्टाइल कोच ल्यूक कौटिन्हो यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे , ज्यामध्ये ते झोपताना आपल्या उशिखाली मीठ ठेवण्याचे फायदे सांगत आहेत.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मीठ उशिखाली ठेवल्यामुळे चांगली झोप लागते, याचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाहीये, मात्र जुन्या काळात याचा उपयोग चांगल्या झोपेसाठी करण्यात यायचा. थोडसं मीठ घेऊन ते एका छोट्या स्वच्छ फडक्यात बांधा, आणि त्याची गाठ बांधून ते फडकं तुमच्या उशीखाली ठेवा. तुम्ही या साठी साधं किंवा रॉक सॉल्ट असं कोणतंही मीठ घेऊ शकतात. यामुळे तुमच्या झोपेतील अडथळा दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते असा दावा ल्यूक कौटिन्हो यांनी केला आहे.
मीठ हे नकारात्मक शक्ती नष्ट करण्याचं काम करते, वास्तुशास्त्रामध्ये देखील मिठाला सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत माण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मीठ उशीखाली ठेवता तेव्हा ते तुमच्या आसपास असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं संरक्षण करतं. आज देखील अनेक कुटुंबांमध्ये जर घरातील लहान मुलं आजारी असेल तर मीठ घेऊन त्याची दृष्ट काढली जाते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवायची असेल तर झोपताना थोडसं मीठ तुमच्या उशिखाली ठेवा.
वाईट स्वप्न पडत नाहीत
या पोस्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, तुम्ही जेव्हा तुमच्या उशीखाली मीठ ठेवून झोपतात, तेव्हा सर्व प्रकारच्या वाईट आणि नकारात्मक शक्तीपासून तुमचं संरक्षण होतं, वारंवार वाईट स्वप्न पडून जर तुमची झोप खंडीत होत असेल तर हा त्रास देखील दूर होतो. मिठामुळे वाईट स्वप्न पडत नाहीत.
जर तुम्ही मायग्रेन सारख्या आजारामुळे त्रस्त असाल शरीर सतत थकत असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. ल्यूक यांनी म्हटलं आहे की याचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही, मात्र मिठामध्ये असे काही गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमचा थकवा दूर होतो. तुम्हाला मायग्रेन सारख्या त्रासापासून आराम मिळू शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
