Vastu Tips : घरात लावा हे चार फोटो; आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही
हिंदू धर्मग्रंथामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमचं घर कसं असावं? हे जसं वास्तुशास्त्र सांगतं तसेच घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या असू नयेत? याच मार्गदर्शन देखील वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आलं आहे.

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत, मात्र जर तुमचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो अशी मान्यता आहे. तुमचं घर कसं असावं? म्हणजे कोणत्या दिशेला असावं? घराच्या मुख्य दरवाजाची दिशा कोणती असावी? कोणती असू नये? तुमच्या घराचं बेडरूम कोणत्या दिशेला असावं? कोणत्या दिशेला असू नये? स्वंयपाक घर कोणत्या दिशेला असावं? अशा एकना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आलं आहे.
जसं तुमचं घर हे कोणत्या दिशेला असावं? कसं असावं याचं मार्गदर्शन वास्तुशास्त्रात करण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे? तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या वस्तू असू नये? तुमच्या घरात ज्या वस्तू आहेत? त्या कोणत्या दिशेला असाव्यात, उदाहारण द्यायचं झालं तर तुमच्या घरात मंदिराची दिशा कोणती असावी? देव तेवतांचे फोटो कोणत्या दिशेला असावेत याचं मार्गदर्शन देखील वास्तुशास्त्रात करण्यात आलं आहे.
वास्तुशास्त्रात अशा काही फोटोंबद्दल देखील सांगण्यात आलं आहे, ते फोटो जर तुमच्या घरात असतील तर शुभ समजले जातात. ज्या फोटोंमुळे तुमची प्रगती होते, भरभराट होते. आयुष्यात पैशांची कमी जणवत नाही. अशा काही फोटोंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सात घोड्यांचा फोटो – सात घोडे आणि उगवत्या सूर्याचा फोटो हा वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मनला गेला आहे. हा जर फोटो तुम्ही तुमच्या घरात लावला तर त्यामुळे घरात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रगती होते असं वास्तुशास्त्र सांगतं.
हंसांचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात हंसाच्या जोडीचा फोटो असणं शुभ आहे, त्यामुळे तुमची करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. कौटुंबीक सुख प्राप्त होतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
उगवत्या सुर्याचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात उगवत्या सुर्याचा फोटो असणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
देवी देवतांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवी देवतांचे फोटो असणं शुभ मानलं गेलं आहे, मात्र देवी देवतांचे फोटो घरामध्ये लावताना दिशेबद्दलची काळजी घ्यावी असं वास्तुशास्त्रा सांगतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
