
हिंदू धर्मशास्त्रामध्ये हत्तीला शुभ समजलं जातं. त्याचप्रमाणे घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. हत्तीच्या मूर्तीला सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. हत्ती ऊर्जेचं देखील प्रतिनिधित्व करतो. घरात हत्तीची मूर्ती असल्यास सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होऊन घरात सकारात्मक ऊर्जा राहाते, असंही मानलं जातं. हत्तीला शक्तीचं देखील प्रतीक समजलं जातं. तुमच्या घरात जर हत्तीची मूर्ती असेल तर तुमच्या घरावर येणारे सर्व संकटं दूर होतात अशी मान्यता आहे.
घराच्या प्रवेश द्वारावर हत्तीची मूर्ती
अनेक जुन्या घरांवर किंवा इमारतींवर तुम्हाला आजही हत्तीची मूर्ती पाहायला मिळते. वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून हत्तीची मूर्ती असेल तर त्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळते, तुमच्या सन्मानामध्ये वाढ होते. तसेच लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहाते, असं मानलं जातं.
चांदीचा हत्ती
वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. चांदीचा हत्ती सौभाग्य, समृद्धी आणि शक्तीचं प्रतिक असतो. घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवला पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते.
लाल हत्ती
वास्तुशास्त्रामध्ये लाल हत्तीला देखील खूपच शुभ समजलं जातं.लाल हत्ती हा शक्ती आणि यशाचं प्रतिक मानलं जातं. तुम्ही लाल हत्तीची मूर्ती तुमच्या घरात दक्षिण दिशेला ठेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मान-सन्मानामध्ये प्रचंड वाढ होते. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहाते.
पांढरा हत्ती
पाढऱ्या हत्तीच्या मूर्तीला घराच्या प्रवेश द्वारावर उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावे, पांढरा हत्ती हा सैभाग्याचं प्रतिक मानला जातो. तसेच तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो.
हिरवा आणि काळा हत्ती
हिरवा आणि काळ्या हत्तीला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूपच शुभ मानण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात तुम्ही हिरव्या किंवा काळ्या हत्तीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला कायम यश मिळतं
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)