Vastu Tips : ‘या’ तीन वनस्पती म्हणजे जणू पैशांचं झाडच; घरात लावताच दिसतो चमत्कार
वास्तु शास्त्रामध्ये अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्यावर सदैव माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपादृष्टी राहाते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

हिंदू धर्माशास्त्रामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर यांना धनाची देवता मानण्यात आलं आहे. वास्तु शास्त्रामध्ये अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्यावर सदैव माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपादृष्टी राहाते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तुमचं घर सदैव सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहातं. या झाडांना शुक्रवारी किंवा मंगळवारी घरामध्ये लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सदैव सकारात्मक ऊर्जा राहील, सोबतच तुम्हाला कधीही पैशांची अडचण जाणवणार नाही. जाणून घेऊयात अशाच काही वृक्षांबद्दल
लकी बांबू प्लांट – वास्तू शास्त्रामध्ये लकी बांबू प्लांटला खूप महत्त्व आहे. घरामध्ये लकी बांबू प्लांट असणं शुभ मानलं गेलं आहे. जसा -जसा हा बांबू प्लांट वाढतो तशी -तशी तुमच्या धन संपत्तीमध्ये देखील वृद्धी होते, असं मानलं जातं. ज्या घरामध्ये लकी बांबू प्लांट असतो त्या घरामध्ये सदैव सुख, समुद्धी राहाते. या वनस्पतीला तुम्ही तुमच्या घरात असलेल्या एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवू शकतात. बाजारामध्ये विविध प्रकारचे बांबू प्लांट उपलब्ध आहेत.
तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळसीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीला पवित्र मानलं गेलं आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर तुम्हाला तुळस लावलेली दिसून येते.घरामध्ये तुळस असणं हे शुभ मानलं जातं. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहाते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहाते. त्या घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही.
मनी प्लांट – मनी प्लांटला देखील वास्तू शास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे. ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरामध्ये पैसा आपोआप ओढला जातो, अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे. ज्या घरामध्ये मनी प्लांट असतो त्या घरामध्ये सदैव समृद्धी राहाते असं मानलं जातं. घरात सकारात्मक ऊर्जा राहाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
