Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी या ठिकाणी ठेवा भगवान बुद्धांची मूर्ती, सुख- समृद्धी नांदेल

अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतात. यामुळे घरात तणाव वाढतो. कधीकधी या समस्यांचे कारण म्हणजे वास्तु दोष. वास्तुशास्त्रात सर्व वस्तू ठेवण्याचा एक योग्य दिशा आणि मार्ग आहे. याशिवाय, वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे वास्तुदोषाचा त्रास दूर होऊ शकतो. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते. वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी आपण भगवान बुद्धांची मूर्ती घरात ठेवू शकता (Vastu Tips To Keep The Buddha Statue For Happiness And Wealth).

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी या ठिकाणी ठेवा भगवान बुद्धांची मूर्ती, सुख- समृद्धी नांदेल
BUDDHA
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 30, 2021 | 3:32 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आनंद आणि शांती हवी असते. यासाठी लोक विविध उपाययोजना करतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतात. यामुळे घरात तणाव वाढतो. कधीकधी या समस्यांचे कारण म्हणजे वास्तु दोष. वास्तुशास्त्रात सर्व वस्तू ठेवण्याचा एक योग्य दिशा आणि मार्ग आहे. याशिवाय, वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे वास्तुदोषाचा त्रास दूर होऊ शकतो. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते. वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी आपण भगवान बुद्धांची मूर्ती घरात ठेवू शकता (Vastu Tips To Keep The Buddha Statue For Happiness And Wealth).

घराच्या सजावटीमध्ये तुम्ही भगवान बुद्धांची मूर्ती देखील ठेवू शकता. हे केवळ घराचे सौंदर्यच नाही वाढवत तर मानसिक शांती देखील देते. त्याचबरोबर आपल्या घरात आनंद आणि समृद्धी कायम राहाते. जाणून घ्या भगवान बुद्धांची मूर्ती कशी आणि कोणत्या ठिकाणी ठेवावी –

घराचा मुख्य दरवाजा

वास्तुनुसार, भगवान बुद्धांची संरक्षण मुद्रेमधील मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित करावी. रक्षा मुद्रेमध्ये भगवान बुद्धांचा एक हात आशीर्वादच्या रुपात असतो, तर दुसरा हात संरक्षणार्थ असतो. भगवान बुद्धांची मूर्ती भिंतीपासून 4 ते 5 किमी वर ठेवावी.

लिव्हिंग रुममध्ये

वास्तुनुसार, लिव्हिंग रुममध्ये भगवान बुद्धांची मूर्ती उजवीकडे वाकलेल्या मुद्रेत ठेवावी. अशा प्रकारे मूर्ती ठेवा की बुद्धांचा चेहरा पश्चिम दिशेने असावा. आपण ती टेबलवर ठेवू शकता. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते.

पूजेच्या ठिकाणी

भगवान बुद्धांची मूर्ती मंदिरात ठेवल्याने पूजेच्या वेळी ध्यान लावण्यात मदत होते. या मूर्तीचा चेहरा पूर्व दिशेने असावा. हे देखील लक्षात ठेवा की पुतळा डोळ्यांच्या पातळी खाली असू नये. त्याला खाली ठेवणे अशुभ मानले आहे. बुद्धांची मूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मकता वाढते.

मुलांच्या खोलीत

बाजारपेठेत भगवान बुद्धांची मूर्ती वेगवेगळ्या मुद्रेत मिळतात, आपण लहान मुलांच्या खोलीत झोपलेले भगवान बुद्ध ठेवू शकता. यामुळे ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि यशस्वी होण्याची शक्यताही वाढेल.

Vastu Tips To Keep The Buddha Statue For Happiness And Wealth

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Vastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें