AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती? अनेक जण करतात ही मोठी चूक

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील घड्याळ केवळ वेळ सांगण्याचं एक साधनच नाहीये, तर तो ऊर्जेचा एक सकारात्मक स्त्रोत आणि यशाचं प्रतिक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात योग्य दिशेला योग्य रंगाचे आणि योग्य स्थितीत घड्याळ लावल्यास तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, घरात समृद्धी आणि सुख शांती येते, चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिशेला घड्याळ लावणं शुभ मानलं जातं.

Vastu Tips : घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती? अनेक जण करतात ही मोठी चूक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 6:34 PM
Share

वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक गोष्टींसंदर्भात मार्गदर्शक करते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सजावटीपासून ते घरातील छोट्या-छोट्या वस्तुंपर्यंत सर्व घटक तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम निर्माण करत असतात. घड्याळाचा देखील या वस्तूंमध्ये समावेश होतो. घड्याळ हे केवळ वेळ सांगण्याचंच साधन नाहीये तर ते तुमच्या घरात येणाऱ्या ऊर्जेला देखील प्रभावित करत असते, योग्य दिशेला आणि योग्य रंगाचे घड्याळ तुम्ही जर भिंतीवर लावले तर तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहतं, कुटुंबात सुख शांती येते. योग्य दिशेला लावलेलं घड्याळ हे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतं असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा कार्यालयात घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा सगळ्यात जास्त शुभ मानण्यात आली आहे. कारण पूर्व दिशा ही सुर्याची दिशा असते. त्यामुळे तुम्ही जर घड्याळ पूर्व दिशेला लावलं तर घरातील कुटुंबप्रमुखाला किंवा इतर सदस्यांना जसा दिवस रोज उगतो, त्याचप्रमाणे प्रगतीच्या नवनवी संधी प्राप्त होतात. व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळतं. या शिवाय पूर्व दिशा ही मुलांच्या अभ्याससाठी देखील शुभ मानली गेली आहे. या दिशेला जर तुम्ही घड्याळ लावले तर ते वातावरण संतुलीत करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, ही दिशा धन आणि भाग्याचं प्रतिक आहे. जर तुम्ही उत्तर दिशेला घड्याळ लावलं तर तुमच्या घरात आर्थिक स्थिरता निर्माण होते, आणि धनात देखील वृद्धी होते. जे लोक व्यवसाय करतात त्या लोकांसाठी उत्तर दिशा ही विशेष शुभ मानली जाते. उत्तर दिशेला जर घड्याळ लावले तर व्यक्तीला वेळेचं महत्त्व आणि नव्या संधी लक्षात येतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. उत्तर दिशेला लावण्यात आलेल्या घड्याळामुळे कुटुंबात शांतता आणि प्रेम, आपुलकी रहाते, पत्नी -पत्नीमध्ये कधीच भांडणं होत नाहीत.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये, ही दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा असते. त्यामुळे या दिशेला घड्याळ लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास तुम्हाला नव्या संधी मिळ नाहीत, तुम्हाला ज्या संधी मिळणार असतात त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यामुळे तुमची प्रगंती थांबू शकते. त्यामुळे कधीही घड्याळ हे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावावे ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत