Vastu tips: घराच्या दक्षिण-पश्चिमेला काय ठेवाल?, काय लाभ होतील?, वाचून तर पाहा

वास्तूनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला नैऋत्य कोपरा म्हणतात. असे मानले जाते की घराचा हा कोपरा स्थिरतेचे प्रतिनिधीत्व करतो. म्हणूनच या ठिकाणी वस्तू ठेवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असं केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

Vastu tips: घराच्या दक्षिण-पश्चिमेला काय ठेवाल?,  काय लाभ होतील?,  वाचून तर पाहा
वास्तुशास्त्रातील या टिप्स फॉलो करा.
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 01, 2022 | 3:39 PM

घरात एखादी वस्तू ठेवण्यासाठी काही नियम आणि उपाय वास्तु टिप्समध्ये (Vastu Tips) सांगण्यात आले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष करणे केवळ घरावरच नाही तर हेल्थवर ही भारी पडू शकतं. घरातील वास्तुदोषांमुळे (Vastudosh) संपूर्ण कुटुंबाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो.या कारणामुळेच घरात सामान ठेवताना योग्य दिशा जाणून घेणे गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला घराच्या नैऋत्य दिशेशी संबंधित काही वास्तु टिप्स सांगणार आहोत. वास्तूनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला नैऋत्य कोपरा म्हणतात. असे मानले जाते की घराचा हा कोपरा स्थिरतेचे प्रतिनिधीत्व करतो. म्हणूनच या ठिकाणी वस्तू ठेवताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असं केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होऊ शकते. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर या दिशेशी संबंधित वास्तू दोष तुमच्यावर परिणाम करू लागले तर तुम्हाला अतिरिक्त खर्च आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दिशेने तुम्ही कोणत्या प्रकारचे सामान ठेवू शकता. त्याबद्दल जाणून घ्या…

जड वस्तू ठेवा

या दिशेला काही ठेवायचे असेल तर ते जड असले पाहिजे हे लक्षात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचा वॉर्डरोब इथे ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्ही रोख रक्कम किंवा इतर महागड्या वस्तू ठेवू शकता. असे मानले जाते की असे केल्याने घरातील पैशाची कमतरता दूर होते आणि प्रगतीचे नवे आयाम खुले होतात.

विंड चाइम्स सारख्या गोष्टी ठेवा

अनेक वेळा घरात असलेल्या नकारात्मकतेमुळे जीवनात समस्या निर्माण होतात. घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला विंड चाइम, पिरॅमिड किंवा एखादं शुभ रोपे लावल्यास त्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. या शुभ गोष्टी इथे ठेवल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते. यासोबतच तुमचे आरोग्यही निरोगी राहते.

गणपतीची मूर्ती

कधीकधी लोक घर असे बनवतात की त्यांचा मुख्य दरवाजा दक्षिण-पश्चिम दिशेला असतो. कदाचित तुमच्या घरातील वास्तू दोषांचे हे देखील एक कारण असु शकते, पण, तुम्ही ते सहज दूर करू शकता. वास्तूनुसार अशा स्थितीत घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती ठेवावी.

हे सुद्धा वाचा

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें