AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra: तुमच्याघरीसुद्धा मोजून पोळ्या बनवतात? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

हिंदू धर्मात  ताजे अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात (Vastushastra) स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या (make chapatis by counting) तर त्याचा दुष्परिणाम ( Know its side effects) घरातील लोकांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर होतो. आता काहींना वाटेल की, मोजून पोळ्या बनवणे […]

Vastushastra: तुमच्याघरीसुद्धा मोजून पोळ्या बनवतात? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
| Updated on: Jun 17, 2022 | 8:26 PM
Share

हिंदू धर्मात  ताजे अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात (Vastushastra) स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या (make chapatis by counting) तर त्याचा दुष्परिणाम ( Know its side effects) घरातील लोकांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर होतो. आता काहींना वाटेल की, मोजून पोळ्या बनवणे यात काय चुकीचे आहे किंवा पोळ्या मोजून नाही बनवायच्या तर कशा बनवायच्या? तर मनात एखादा आकडा ठरवून तितक्याच पोळ्या बनविणे आणि उरलेला गोळा फ्रिजमध्ये ठेवणे याला मोजून पोळ्या बनविणे म्हणता येईल. असे न करता अंदाजे पोळ्या बनवाव्या एखादी पोळी उरली तर ती घर म्हणून राहू द्यावी. सकाळी ती नाश्त्यात खावी किंवा गाईला लावावी. असे न करण्यामागे काही मान्यता आहेत त्याही जाणून घेऊया.

पहिली मान्यता ज्योतिषशास्त्रानुसार गहू सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत सूर्य ग्रहाचा प्रभाव गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्यावर किंवा इतर खाद्यपदार्थांवरही पडतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार मोजून घरात पोळ्या बनवल्या तर सूर्यदेवाचा अपमान होतो. त्याच वेळी, सूर्य ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या सन्मानावर, आत्मविश्वासावर, आरोग्यावर आणि प्रगतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दुसरी मान्यता याशिवाय हिंदू सनातन धर्मात सकाळच्या जेवणात गायीची पहिली पोळी आणि कुत्र्याची शेवटची भाकर घेण्याची परंपरा आहे. दुसरीकडे, पोळ्या न मोजण्यामागची  समजूत अशी की, जर कधी भुकेलेला माणूस घरी आला तर त्याच्यासाठीही थोडे जास्तीचे अन्न तयार असायला हवे. भुकेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहते. पोळ्यांचे भांडे पूर्णपणे रिकामे ठेवणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की ज्या घरांमध्ये दररोज हा नियम पाळला जातो त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आई अन्नपूर्णाच्या कृपेने धान्याचा साठा भरून राहतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.