AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : धन प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रातले चार सोपे उपाय, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा असं होतं की आपल्याकडे खूप पैसा येतो, परंतु तो हातात टिकत नाही. त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastushastra : धन प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रातले चार सोपे उपाय, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 9:21 PM
Share

काही लोक हे प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही. तसेच ते खूप पैसा कमवतात मात्र तो पैसा त्यांच्या हातात टिकत नाही. अशा लोकांचं बँक अकाउंट नेहमी रिकामं असतं. असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर या मागे दोन मुख्य कारणं असतात एक म्हणजे जर तुमच्या घरात पितृदोष असेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आर्थिक समस्या येतात. तुमच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. तसेच तुमच्या घरात काहीही कारण नसताना वादविवाद वाढतात. पती-पत्नीचं पटत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या घरात ऊर्जा असंतुलन निर्माण होतं, ज्या घरात ऊर्जेचं संतुलन साधलं जात नाही, त्या घरात नेहमीच आर्थिक समस्या असात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण असे चार सोपे उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील.

सगळ्या सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे एक छोटं लाल कापड घ्या, त्यामध्ये पाच विलायची, पाच लवंग आणि एक तेज पत्ता टाका तसेच थोडा भिमसेनी कापूर देखील टाका. या लाल कापडाची पोटली करा. ही पोटली तुम्ही कुठेही ठेवू शकता, जसं की तुमच्या खिशात, पाकिटामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या सर्व आर्थिक समस्या हळुहळु दूर होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

ज्या लोकांना पितृदोष असतो त्यांना देखील आर्थिक समस्या येतात, अशा लोकांनी सकाळी अंघोळ झाल्यानंतर दररोज पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी, तसेच पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा, यामुळे पितृदोष दूर होतो, आणि तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा असते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. या दिशेला कधीही टाकऊ वस्तू किंवा भंगार सामान ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तसेच उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेरांचा फोटो लावावा, यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात.

लक्ष्मी पूजनाच्यावेळी आपण लक्ष्मी मातेच्या फोटो समोर कवड्या ठेवतो. त्यानंतर या कवड्या एका लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्याव्यात. या सोप्या उपायामुळे तुम्हाला  पैशांची कमी भासणार नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट