AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : महादेवाच्या मंदिरात अर्पण करा या सात वस्तू, आयुष्यच बदलून जाईल, तिजोरी धनाने भरेल

महादेवांना देवाचे देव म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून जातं. त्याच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastushastra : महादेवाच्या मंदिरात अर्पण करा या सात वस्तू, आयुष्यच बदलून जाईल, तिजोरी धनाने भरेल
MAHADEVImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:50 PM
Share

महादेवांना देवाचे देव म्हटलं जाते. जेव्हा तु्म्ही अंतकरणातून महादेवांची भक्ती करतात, प्रार्थना करतात, तेव्हा महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून जातं. त्याच्यावर येणारी सर्व संकट दूर होतात. आयुष्यात तो व्यक्ती यशस्वी होतो, असं हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्या उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही महादेवांना अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होतात. महादेवांच्या कृपेनं तुमच्या सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या मनाला अध्यात्मिक शांती लाभते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

बेलपत्र – महादेवांना बेलाची पानं ही अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगावर बेलाची पान अर्पण करू शकतात. यामुळे तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

पांढरं फूल – वास्तुशास्त्रानुसार महादेवांना पांढरं फूल देखील अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दर सोमवारी महादेवांची पूजा करताना महादेवांना पांढरं फूल अर्पण करावं, यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात. घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. महादेवांच्या कृपेनं तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत.

नवैद्य- दर सोमवारी महादेवांची पूजा करावी, पुजेनंतर महादेवांना फूलं अर्पण करावं आणि त्यानंतर नवैद्य अर्पण करावा. महादेवांना नवैद्य अर्पण केल्यानंतरच तुमची पूजा पूर्ण झाली असं मानलं जातं. नवैद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुजेचं अपेक्षित फळ मिळतं.

आत्तर – महादेवांना सुवासिक अत्तर अर्पण करावं , यामुळे महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.

पंचामृत – महादेवांना दर सोमवारी पंचामृत अर्पण करावे, यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात असं मानलं जातं.

दूध – महादेवांना दूध देखील अर्पण करावं, यामुळे घराला बरकत प्राप्त होते.

धूप – महादेवांना धूप अर्पण करावा, यामुळे महादेव प्रसन्न होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा