AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : पितृदोषाने त्रस्त आहात? मग अमावस्येच्या दिवशी करा हा खास उपाय, सर्व समस्या होतील दूर

ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, अशा लोकांच्या आयुष्यात नेहमी काही न काही समस्या येतच असतात. वास्तुशास्त्रात पितृदोष दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या उपायामुळे तुमच्या कुंडलीमधील पितृदोष नाहीसा होईल.

Vastushastra : पितृदोषाने त्रस्त आहात? मग अमावस्येच्या दिवशी करा हा खास उपाय, सर्व समस्या होतील दूर
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 9:31 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर अध्यात्मिक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात कायम आर्थिक समस्या निर्माण होतात. एवढंच नाही तर घरात काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत सारखे वाद होतात, त्यामुळे घर नेहमी अशांत राहतं. मनात एक प्रकारची अस्वस्थता असते, तसेच घरात आजारपण देखील वाढतं. त्यामुळे कुंडलीमधील पितृदोष दूर करणं गरजेचं असतं, जसं हिंदू धर्मशास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्याचे काही उपाय सांगण्यात आले आहेत, तसेच वास्तुशास्त्रामध्ये देखील पितृदोष दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अमावस्येच्या दिवशी करा हा सोपा उपाय – अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घावावेत. तसेच थोडसं गुगुळ, पिवळी मोहरी आणि काळे तीळ घ्या. एक मातीचं भांड देखील घ्या. आता हे गुगुळ, पिवळी मोहरी आणि काळे तीळ मातीच्या भांड्यामध्ये एकत्र करा. या सर्व वस्तु एकत्रीतपणे कापूर किंवा गोवरीसोबत जाळा. हा धूर तुमच्या संपूर्ण घरात फिरवा आणि त्यानंतर हे भांड घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. तसेच तुमच्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांची प्रार्थना करा. या उपायामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील, घरातील सर्व प्रकारचा पितृदोष दूर होईल असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे आणखी काही उपाय देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जसे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो, अशा व्यक्तीने नेहमी गरजू व्यक्तींना आवश्यक त्या गोष्टींचं दान केलं पाहिजे. गाईला नित्यनियमाने चारा खाऊ घातला पाहिजे. पूर्वजांच्या श्राद्ध आणि पक्ष तिथिला तर्पण दिलं पाहिजे. या उपायांमुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या मनाला शांती मिळते, आणि तुमच्या कुंडलीमध्ये असलेला पितृदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...