AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि विनायक चतुर्थीची कथा

पवित्र श्रावण महिना सुरु आहे. शिवभक्तांसाठी हा महिना इच्छा पूर्ण करणारा आहे. श्रावणमध्ये अनेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात. हिंदू धर्मानुसार, या महिन्यात येणाऱ्या सणांचे महत्त्वही मोठे असते. आज विनायक चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि विनायक चतुर्थीची कथा
Lord Ganesha
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 8:55 AM
Share

मुंबई : पवित्र श्रावण महिना सुरु आहे. शिवभक्तांसाठी हा महिना इच्छा पूर्ण करणारा आहे. श्रावणमध्ये अनेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात. हिंदू धर्मानुसार, या महिन्यात येणाऱ्या सणांचे महत्त्वही मोठे असते. आज विनायक चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हिंदू दिनदर्शिकेनुसार विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते.

मान्यता आहे की, भागवान गणेश आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे, सर्व दुःख दूर करतात. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला धनलाभ होते. श्रावण महिन्याची पहिली विनायक चतुर्थी आज 12 ऑगस्ट 2021 रोजी साजरी केली जाईल. श्रावणमधील विनायक चतुर्थीच्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त तसेच विनायक चतुर्थीची कथा याबद्दल जाणून घेऊया.

श्रावण विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त

? विनायक चतुर्थी तिथी प्रारंभ – 11 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 04:53 पासून

? विनायक चतुर्थी तिथी समाप्त – 12 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 03:24 पर्यंत

विनायक चतुर्थी पूजेची पद्धत

? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.

? या दिवशी पूजास्थळ स्वच्छ करुन गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.

? गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करा .

? त्यानंतर गणपतीला लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.

? गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा.

? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.

विनायक चतुर्थीची कथा

गणेश जी शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते. पण, तुम्हाला त्यांच्या जन्माची कथा माहित आहे का? पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने आपल्या शरिरावरील मैलापासून एका मुलाला तयार केले आणि त्याला जीवंत केले. त्यानंतर देवी पार्वतीने त्या मुलाला आदेश दिला की ती आंघोळ करणार आहे आणि या काळात कोणालाही आत येऊ देऊ नये. मुलाने आईच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आणि त्याने कंदाराच्या गेटवर पहारा देण्यास सुरुवात केली. काही वेळाने भगवान शिव यांचे आगमन तिथे झाले. मुलाने महादेवाला आत जाण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या भोलेनाथांनी आणि त्रिशूळाने त्या मुलाचे शिर शरिरापासून वेगळे केले.

काही वेळानंतर, अंघोळ केल्यावर जेव्हा देवी पार्वती आळी आणि त्यांनी मुलाचे शिर शरिरापासून विभक्त झालेले पाहिले. हे पाहून देवी पार्वतीला खूप राग येतो. देवी पार्वतीचा राग पाहून सर्व देवी-देवता भयभीत होतात. यानंतर, भगवान शिव त्यांच्या गणांना आज्ञा देतात की ज्या प्राण्याच्या आईची पाठ तिच्या मुलाकडे असेल त्याला घेऊन या.

शिव गण एका गजाला घेऊन येतात. भगवान शिव मुलाच्या शिराला मुलाच्या शरिराशी जोडतात. हे पाहून देवी पार्वती म्हणते की प्रत्येकजण माझ्या मुलाची थट्टा करेल. मग भगवान शिव त्याला एक वरदान देतात की तो गणपती म्हणून ओळखला जाईल आणि सर्व देवांनी त्याला वरदान दिले की, पहिली पूजा गणपतीची होईल.

विनायक चतुर्थीचे महत्व काय?

भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lalbaugcha Raja 2021 | लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Nag Panchami 2021 | नाग पंचमी कधी? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि इच्छापूर्तीसाठी काय उपाय करावे?

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.