Vinayak Chaturthi 2025: विनायक चतुर्थिला ‘या’ पद्धतीनं पूजा केल्यास आर्थिक टंचाई होईल दूर…
Vinayak Chaturthi Pooja: विनायक चतुर्थी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी चंद्रदर्शन करू नये. असे केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व बाधा दूर होतात. विनायक चतुर्थीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीचा दिवस गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केली जाते. विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यामुळे त्यांचा तुमच्यावर आशिर्वाद राहातो आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि सुख शांती नांदते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
पंचांगानुसार, यंदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 01 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.38 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 02 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:14 वाजपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये 01 फेब्रुवारीला विनायक चतुर्थी साजरी केला जाणार आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेमध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश केल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
विनायक चतुर्थी पूजा विधि :
- चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवी-देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी.
- त्यानंतर पवित्र स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
- त्यानंतर गणपतीची आराधना सुरू करा.
- गणपती बाप्पाला मोदक, दूर्वा, हळद या गोष्टीअर्पण करा.
- गणपती समोर तुपाचा दिवा लावा आणि विधीनुसार आरती करा.
- श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.
- मोदक आणि फळांसह वस्तूंचा नैवेद्य दाखवा.
- जीवनात सुख-शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
- शेवटी घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करावे.
तुम्ही जर आर्थिक टंचाईचा सामना करत असाल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी धावहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करा. त्यासोबतच गणपतीचे ध्यान करावे. मान्यतेनुसार हा उपाय केल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
गणपतीचे मंत्र :
ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥
