जर तुमच्या घरात आपोआप अनेक तुळशी उगवत असतील तर काय आहेत संकेत? वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मामध्ये तुळस अत्यंत पवित्र मानली जाते, तुळशीला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतानुसार ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, कारण तुळस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सर्वात प्रिय असं झाडं आहे.

हिंदू धर्मामध्ये तुळस अत्यंत पवित्र मानली जाते, तुळशीला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतानुसार ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, कारण तुळस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सर्वात प्रिय असं झाडं आहे. त्यामुळे प्रत्येक घराच्या अंगणात तुळस असावीच आणि तिची रोज सकाळी पूजा करावी, तिला जल अर्पण करावं, तसेच सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावावा असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीचे फक्त धार्मिकच महत्त्व नाही तर तिचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. आज आपण माहिती घेणार आहोत की, समजा तुम्ही न लावता देखील जर तुमचा घरात आपोआप अनेक तुळशीची झाडं उगवले तर त्यातून तुम्हाला काय संकेत मिळतात आणि अशा स्थितीमध्ये नेमकं काय करायला हवं?
शुभ संकेत
जर तुमच्या घरात तुळशीचं रोपटं तुम्ही न लावताही आपोआप उगवलं तर तो एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या घरात अशा पद्धतीने तुळस येते, त्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे, असा त्याचा अर्थ होतो. ज्या घरात आपोआप तुळशी उगवू लागतात, त्या घरावरील सर्व आर्थिक आणि इतर संकट दूर होतात. घरात सुख शांती आणि समृद्धी येते, सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तुळस हा सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो, त्यामुळे ज्या घरात आपोआप तुळस उगवते त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहाते, ज्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो, अशी मान्यता आहे.
तुळस जर आपोआप उगवली तर काय कारावे?
जर तुमच्या घरामध्ये तुम्ही न लावता देखील तुळस आपोआप उगवली तर हे खूपच शुभ संकेत असतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या तुळशीला काळजीपूर्वक कुंडीमध्ये लावू शकता, तसेच या तुळशीची दररोज सकाळी अंघोळीनंतर पूजा करा, तिला जल अर्पण करा. सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरामध्ये तुळस असते, त्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही, कारण त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
