AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत, येते दारिद्र्य, जाणून घ्या कोणता दिवस सर्वोत्तम

हिंदू धर्मात नखे कापण्याबाबत विशिष्ट नियम आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मानले जाते आणि कोणत्या दिवशी नखे कापू नयेत याबद्दलही काही नियम आहेत. ते काय आहेत ते जाणून घेऊयात

या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत, येते दारिद्र्य, जाणून घ्या कोणता दिवस सर्वोत्तम
nails cutting dayImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 25, 2025 | 12:15 PM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीशी संबंधित काही विशेष नियम बनवण्यात आले आहेत. नखे कापण्याचे काही खास नियम आहेत. बऱ्याचदा वडीलधारी लोक रात्री किंवा काही खास दिवशी नखे कापण्यास मनाई करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री कधीही नखे कापू नयेत. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी कोपते. चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत आणि कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मनले जाते.

या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत

मंगळवार: ज्योतिषशास्त्रात मंगळवारी नखे कापणे निषिद्ध आहे. मंगळवारी नखे कापल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडते असे मानले जाते. विशेषतः जे लोक हनुमानांचा उपवास करतात, त्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे.

गुरुवार: गुरुवारी नखे कापणे देखील निषिद्ध आहे. गुरुवारी नखे कापल्याने वैवाहिक संबंधांमध्ये कलह निर्माण होतो असे मानले जाते.

शनिवार: शनिवारी देखील नखे कापू नयेत. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत आहे, त्यांनी शनिवारी नखे कापल्यास त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील निर्माण होते.

रविवार: तसेच रविवारी नखे कापल्याने प्रगतीत अडथळे येतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि यशातही अडथळा येतो. रविवारी नखे कापल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे या दिवशीही नखे कापू नयेत.

या दिवशी नखे कापावीत

सोमवार: ज्योतिषशास्त्रात सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते. या दिवशी नखे कापल्याने तमोगुणातून मुक्तता मिळते असे मानले जाते. सोमवार हा भगवान शिव, चंद्र आणि मनाशी संबंधित आहे.

बुधवार: याशिवाय बुधवार हा दिवस देखील नखे कापण्यासाठीही शुभ मानला जातो. बुधवारी नखे कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते. यामुळे व्यवसायात उत्पन्नही वाढते.

शुक्रवार: शुक्रवार हा नखे ​​कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन, समृद्धी आणि सौंदर्य वाढते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार