
आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये ग्रहणाविषयी वाचलं असेल. ग्रहण लागणार आहे, त्याआधी सर्वत्र जोरदार चर्चा असते. नवीन वर्षामध्ये किती ग्रहण असणार आहेत आणि कधी याविषयी अनेकजण माहित करून घेण्यासाठी उत्सुक असताात. नेमकं ग्रहण म्हणजे काय असतं? ग्रहणाचे प्रकार त्यासोबतच ग्रहण काळात काय करू नये? ग्रहणाविषयी सर्वकाही जाणून घ्या. सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण यामधील फरक? सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागलं असं बोललं जातं. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जगात दरवर्षी दोन ते पाच सूर्यग्रहण होऊ शकतात. संपूर्ण ग्रहण दर 18 महिन्यांमध्ये एकदाच होते. रॉयल म्युझियम्स ग्रीनविचच्या म्हणण्यानुसार, एकदा पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी संपूर्ण सूर्यग्रहण दिसले की, त्या भागाला पुढील सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुमारे 400 वर्षे लागतील. ...