Explainer: महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता आता काय करणार? कायम भगव्या वस्रात राहणार की पुन्हा संसारात रमणार ? सर्व काही जाणून घ्या
ममता हीने संन्यासी ते महामंडलेश्वर असा प्रवास अवघा २४ तासांत कसा काय पूर्ण केला? असा प्रश्न अनेकजणांना पडला आहे. ममताने जुना आखाड्यातून गुरु दीक्षा घेतली होती तर ती किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर का बनली? ममता मध्यम मार्गाने सनातन धर्माचा प्रचार करतील की राजकारणात शिरतील? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजून घेऊयात

नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हीची कारकीर्द तशी वादगस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटो शूट करुन त्या काळात हंगामा केला होता. त्यानंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असून ती दिग्दर्शकांना अंडरवर्ल्डकडून फोन करुन चित्रपट पदरात पाडून घ्यायची हे स्पष्ट झाल्याने ती रुपेरी पडद्यावरुन गायब झाली. विक्की गोस्वामी या अंडरवर्ल्ड डॉनशी तिचे संबंध होते. ड्रग्ज प्रकरणात तिच्या कंपनीवर आरोप झाले होते. पोलिसांना जप्त केलेले 80 लाखाचे ड्रग्ज ज्या कंपनीचे तिची ती डायरेक्टर होती. 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहीली आणि अचानक साल 2024 मध्ये ती पुन्हा भारतात आली. आता तिने संन्यास घेतल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. ममता कुलकर्णी हीचा 24 तासांतील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिने गुरु दक्षिणा जूना आखाड्यातून घेतली परंतू महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून का झाली ? ममता मध्यम मार्गाने धर्माचा प्रचार करणार की राजकारणात येणार? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात…. ...
