AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात देवांचे फोटो लावताय? ‘या’ जागी लावणं शुभ, पण ‘इथे’ ठेवण्याची चूक करू नका!

घरात देवांच्या फोटोसाठी देव्हारा ही सर्वात पवित्र जागा मानली जाते. मात्र वास्तूनुसार घरामध्ये देवांचे फोटो योग्य ठिकाणी लावणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण वास्तुनुसार घरामध्ये देवांचे फोटो कोणत्या ठिकाणी लावावे व कोणत्या ठिकाणी लावू नये याबद्दल जाणून घेऊयात.

घरात देवांचे फोटो लावताय? 'या' जागी लावणं शुभ, पण 'इथे' ठेवण्याची चूक करू नका!
घरात देवांचे फोटो लावण्यासाठी योग्य जागा कोणती? Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2026 | 1:16 PM
Share

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तशास्त्रानूसार तुमच्या घरातील देव्हारा हा घरातील ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र असतं. तुमच्या घरात असलेल्या देव्हाऱ्यातून नेहम सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, या ऊर्जेचा परिणाम घरातील व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. त्यातच घरातील देव्हाऱ्यात देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी टिकून राहते. आपल्यापैकी असे अनेकजण आहेत जे देव्हाऱ्या‍ व्यतिरिक्त लिव्हिंग रूम किंवा इतर खोल्यांमध्येही देवाचे फोटो लावतात. तथापि वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, देवाचे फोटो घरातील भिंतीवर लावण्याबाबत काही कठोर नियम आहेत. चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी लावलेले देवांचे फोटो वास्तुदोष आणि आर्थिक समस्या निर्माण करतात. चला तर मग देव्हाऱ्या व्यतिरिक्त घरात देवांचे फोटो कुठे लावावेत आणि कोणत्या ठिकाणी ती लावणे टाळावे, याबद्दल जाणून घेऊयात.

लिव्हिंग रूममध्ये देवाचे फोटो लावू शकतो?

जर घरात देव्हाऱ्यासाठी स्वतंत्र जागा नसेल, तर देवतेची मूर्ती किंवा फोटो लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता. कुटुंबातील सदस्यांचा सर्वाधिक वेळ या खोलीत जात असल्याने, वास्तुशास्त्रानुसार अनेक घरांमध्ये येथे देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवणे शुभ मानले जाते. मात्र देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवताना आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असावा. मूर्तीच्या आसपास किंवा तिच्यावर कोणतीही अनादरकारक अथवा अस्वच्छ वस्तू ठेवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.

तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळही देवांचे फोटो लावू शकता?

काही घरांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या आसपास धार्मिक देवांचे फोटो लावण्याची परंपरा देखील आहे. मात्र देवांचे फोटो थेट मुख्य दरवाजाच्या खाली, जमिनीवर किंवा जिथे लोकांचा पाय पडू शकतो अशा कोणत्याही ठिकाणी ठेवणे टाळा.

मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सरस्वती मातेचं फोटो ठेवू शकता

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत सरस्वती देवीचं फोटो लावणे शुभ मानले जाते. देवी सरस्वतीला विद्या, ज्ञान आणि बुद्धीची देवी मानले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सरस्वती मातेचं फोटो लावतात. तर हे देवींचे फोटो अशा ठिकाणी लावा जिथे मुलांना ते सहज दिसेल आणि अभ्यास करताना त्यांचे लक्ष सकारात्मक राहील.

या ठिकाणी देवांचे फोटो लावू नका

बेडरूममध्ये देवांचे फोटो लावणे टाळा

धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवतांचे फोटो न लावण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः, पती-पत्नीच्या बेडरूममध्ये देवदेवतांचे फोटो लावणे योग्य मानले जात नाही.

बाथरूमजवळ देवांचे फोटो लावणे टाळा

बाथरूममध्ये किंवा त्याच्या जवळच्या आसपासच्या भिंतीवर देवतांचे फोटो लावणे टाळावे. हे धार्मिक दृष्ट्या अयोग्य ठिकाण मानले जाते. त्याचप्रमाणे बाथरूमच्या समोरच्या भिंतीवर देवतांचे फोटो लावणे टाळावे. पूजेशी संबंधित वस्तू घरात स्वच्छ आणि आदरणीय ठिकाणी ठेवणे उत्तम असते.

देवांचे फोटो, मूर्ती जमिनीवर ठेवणे टाळा

वास्तूशास्त्रानुसार देवांचे फोटो थेट जमिनीवर ठेवणे देखील अयोग्य मानले जाते. जर काही कारणास्तव फोटो तात्पुरती जमिनीवर ठेवावीच लागली, तर ती सुरक्षितपणे स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवा. भिंतीवर फोटो लावताना ते सन्माननीय जागी राहील याची खात्री करण्यासाठी त्याची उंची आणि सभोवतालच्या जागेचा विचार करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.