आईवडीलांच्या मृत्यूनंतर मुलाने मुंडण का करायचे असते? काय सांगतं गरुड पुराण?
आई-वडील किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यू झाल्यानंतर मुलाने मुंडण करणे गरजेचे असते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा एक आवश्यक नियम मानला जातो.पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की हे का करतात? जाणून घेऊयात

हिंदू धर्मात, प्रत्येक व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत काही धार्मिक विधींशी जोडलेली असते. प्रत्येक सणांसाठी असो किंवा विविध पुजेसाठी असो. हिंदू धर्मात, हिंदू शास्त्रात अनेक गोष्टींचे नियम देण्यात आले आहेत. तसेच अनेक प्रथा-परंपराही दिलेल्या असतात.ज्याने आपण कळत-नकळत नेहमीच पालन करत असतो.
मुंडण संस्कार का असतात?
आपल्यात शास्त्रात एखाद्याच्या मृत्यूनंतरही अनेक विधी-प्रथा देण्यात आल्या आहेत. अनेक पूजाही करण्यात येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबातील सदस्य त्याच्या मुक्तीसाठी अनेक आवश्यक विधी करतात जेणेकरून या जग सोडून गेलेल्या त्या सदस्याच्या आत्म्याला मोक्ष मिळू शकेल. यातील एक विधी म्हणजे मुंडण संस्कार. हिंदू धर्मात, पालक किंवा जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर मुलाने किंवा इतर कोणत्याही पुरूषाने मुंडण करणे गरजेचे असते. तशी प्रथाच असते. हिंदू धर्मात त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
घरात एखाद्या सदस्याचा मृत्यूनंतर कोणत्या विधी
गरुड पुराणानुसार घरात एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो, तिथे शोक व्यक्त केला जातो. सुतक सुरू झाल्यानंतर, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना 13 दिवस सुतकाचे नियम पाळावे लागतात. या काळात अनेक क्रियाकलाप निषिद्ध मानले जातात. शुभ कार्यांप्रमाणे, नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन कपडे घालणे, स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे इत्यादी गोष्टी निषिद्ध मानल्या जातात.
डोके मुंडण्याची प्रथा का असते?
सुतकच्या नियमांमध्ये दाढी करणे देखील समाविष्ट आहे. आई-वडील किंवा प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल दुःख आणि वेदना व्यक्त करण्यासाठी डोके मुंडण्याची प्रथा असते. जेणेकरून त्या व्यक्तीचे लक्ष काही दिवसांसाठी सांसारिक इच्छांपासून दूर करता येईल. डोके मुंडणे मृत व्यक्तीबद्दल आदर आणि शोक व्यक्त करते. गरुड पुराणानुसार, डोके मुंडल्याने पापांचा नाश होतो.
नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते
असे मानले जाते की केस देखील नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. याचा अर्थ असा की मृत व्यक्ती अंत्यसंस्कार आणि 13 व्या दिवसापर्यंत त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. या कारणास्तव, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचे जीवनाशी असलेले सर्व संबंध तोडण्यासाठी मुंडन केले जाते.
स्वच्छतेची काळजी घेतली जाते
एखाद्याच्या मृत्यूनंतर डोके मुंडण्याचा एक वैज्ञानिक पैलू देखील आहे, म्हणजेच एखाद्याच्या मृत्यूनंतर स्वच्छतेची देखील खूप काळजी घेतली जाते. मृत व्यक्तीभोवती किंवा स्मशानभूमीत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. म्हणून, हे टाळण्यासाठी अनेक नियमांचे पालन केले जाते. स्वच्छता आणि पवित्रता राखण्याच्या या नियमांमध्ये मुंडण केले जाते.
