Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

शनिवारच्या दिवशी शनि देवाला तेल अर्पण केलं जाते, हे आपण लहानपणीपासून पाहात आलो आहेत (Oil Is Offered To Lord ShaniDev). घरातील मोठे धर्मासंबंधित ज्या गोष्टींचं, परंपरेचं पालन करतात तेच आपण करतो.

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा...
Lord ShaniDev

मुंबई : शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल अर्पण केलं जाते, हे आपण लहानपणीपासून पाहात आलो आहेत (Oil Is Offered To Lord ShaniDev). घरातील मोठे धर्मासंबंधित ज्या गोष्टींचं, परंपरेचं पालन करतात तेच आपण करतो. याचा उल्लेखही शास्त्र आणि पुराणांमध्ये मिळतो (Why Oil Is Offered To Lord ShaniDev Know The Story Behind It).

पुराणांनुसार शनि देवाला तेल अर्पण करण्याचं काय महत्व आहे? शनि देवालाच तेल का अर्पण केलं जाते, तसेच या तेलात आपला चेहरा का पाहिला जातो?, जाणून घ्या सर्व काही

पौराणिक कथा काय?

शनिदेव यांना तेल अर्पण करण्याविषयी दोन कथा प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार, शनिदेव आपल्या शक्ती आणि सामर्थ्यामुळे खूप अहंकार झाला होता. त्या काळात रामभक्त बजरंगबलीच्या पराक्रमाची आणि शक्तीची सर्वत्र चर्चा होती. शनिदेव यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते हनुमानाशी लढायला निघाले. तेथे त्यांनी पाहिले की हनुमानजी एकांतात श्रीरामाच्या भक्तीमध्ये रमलेले होते.

शनिदेवांनी हनुमानाला युद्धाचे आव्हान दिले. हनुमानजी यांनी स्पष्ट केले की ते आता आपल्या भगवान श्री रामांचे ध्यान करीत आहेत. हनुमान जींनी शनिदेव यांना जाण्यास सांगितले. पण शनिदेव त्यांना युद्धासाठी आव्हान देत राहिले आणि हनुमानाजींनी समजावल्यावरही ते समजले नाहीत. शनिदेव युद्धावर ठाम राहिले, तेव्हा हनुमानजींनी पुन्हा सांगितले की माझ्या राम सेतूच्या परिक्रमेची वेळ झाली आहे, कृपया येथून जा. शनिदेव तरीही ऐकले नाहीत, तेव्हा हनुमानजींनी शनिदेवला आपल्या शेपटीला गुंडाळले आणि राम सेतुची परिक्रमा सुरु केली.

शनिदेवाचं संपूर्ण शरीर जमिन आणि मार्गातील खडकांमध्ये घर्षण होऊन जखमी झाले. त्यांच्या शरीरीतून रक्त येऊ लागले आणि त्यांना खूप त्रास होऊ लागला. तेव्हा शनिदेवाने हनुमानजींची माफी मागितली आणि सांगितले की माझ्या उदंडतेचा परिणाम मला मिळाला आहे. कृपया मला मुक्त करा. तेव्हा हनुमान जी म्हणाले, जर तू माझ्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम न होण्याचे वचन दिले, तरच मी तुम्हाला मुक्त करु शकतो.

तेव्हा शनिदेव म्हणाले की, माझा तुमच्या भक्तांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवला मुक्त केले आणि त्यांच्या जखमी शरीरावर तेल लावले ज्यामुळे शनिदेवांना दिलासा मिळाला. तेव्हा शनिदेव म्हणाले की, जे लोक मला तेल अर्पण करतील, त्यांचे आयुष्य समृद्ध होईल आणि त्यांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही आणि तेव्हापासून शनिदेव यांना तेल अर्पण करण्याची परंपरा सुरु झाली.

दुसरी पौराणिक कथा

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, एकदा रावणाने सर्व ग्रहांना स्वतःच्या हिशोबाने राशीत बसवले. पण, शनिदेवाने रावणाची आज्ञा पाळण्यास नकार दिला. म्हणून रावणाने त्याला उलटं लटकवलं.

यानंतर हनुमानजी लंकेला पोहोचले, तेव्हा रावणाने हनुमानजींच्या शेपटीला आग लावली. हनुमानजीने उड्डाण केले आणि संपूर्ण लंका जाळून टाकली. आगीनंतर सर्व बंदिस्त ग्रह पळून गेले. पण उलटे लटकल्याने शनिदेवाची सुटका होऊ शकली नाही. शनिदेवाच्या अंगावर खूप वेदना होत होत्या. तेव्हा हनुमानजींनी शनिदेवला तेल लावले ज्याने शनिदेवाच्या वेदना कमी झाल्या. यानंतर शनिदेव म्हणाले की आजपासून मला तेल देणाऱ्या सर्व लोकांची वेदना मी घेईन. त्यानंतर शनिदेव यांना तेल अर्पण करण्यात आले.

शनिदेवांना तेल अर्पण करताना त्या तेलात आपला चेहरा पाहिल्याने शनि दोषांतून मुक्तता मिळते आणि समृद्धी येते.

Why Oil Is Offered To Lord ShaniDev Know The Story Behind It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?