एक असं महायज्ञ, ज्यामुळे सापांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं…

आपल्या पौराणिक मान्यतांमध्ये अनेक कथांचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रोचक कथा सांगणार आहोत. महाभारतानुसार, परीक्षित अर्जुनचा नातू आणि अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा होता. परीक्षित हस्तिनापूरचा राजा असताना, तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. | How Did Parikshit Son Took Revenge Of His Fathers Death To Takshak Nagraj

एक असं महायज्ञ, ज्यामुळे सापांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं...
Snake

मुंबई : आपल्या पौराणिक मान्यतांमध्ये अनेक कथांचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रोचक कथा सांगणार आहोत. महाभारतानुसार, परीक्षित अर्जुनचा नातू आणि अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा होता. परीक्षित हस्तिनापूरचा राजा असताना, तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. जंगलातल्या प्राण्यांचा पाठलाग केल्यामुळे त्याला तहान लागली, म्हणून ते पाण्याच्या शोधात शमिक ऋषीच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्याने पाहिले की शमिक ऋषी डोळे बंद करुन ध्यानात मग्न होते.(Why Parikshit Son Took Revenge Of His Fathers Death To Takshak Nagraj Know The Story)

तहानेने व्याकूळ होऊन राजा परीक्षितने त्यांच्याकडे पाणी मागितले. पण ध्यानात असल्याने शमिक ऋषींना काहीच उत्तर देता आले नाही. यावर परीक्षितला राग आला आणि त्याने जवळच पडलेला मृत साप ऋषींच्या गळ्यात टाकला.

शापामुळे राजा परीक्षितचा मृत्यू

शमिक ऋषीचा मुलगा श्रृंगी जेव्हा आश्रमात पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या गळ्यात एक मृत साप लटकलेला पाहिला. हे सर्व राजा परीक्षितने केल्याचे त्याला कळाले. चिडलेल्या, शृंगीने राजा परीक्षितला शाप दिला की आजपासून सातव्या दिवशी नागराज तक्षक यांनी चावल्यामुळे तुझा मृत्यू होईल.

मुलाने मृत्यूचा सूड घेण्याचे वचन दिले

श्रृंगीच्या शापानंतर राजा परीक्षितने स्वत:ला सापांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु सातव्या दिवशी, फुलांच्या टोपलीत अळीच्या वेषात आलेल्या तक्षक नागराज राजा परीक्षितला चावला आणि त्याचा मृत्यू झाला. आता या घटनेची माहिती राजा परीक्षितचा मुलगा जनमेजय यांना मिळाली. जनमेजय हा पांडव घराण्याचा शेवटचा राजा होता. तक्षक नाग याचा सूड घेण्याचा संकल्प त्याने केला.

लाखो सापांची आहुती

जनमेजयने सर्प मेध यज्ञाचं अनुष्ठान केलं. या यज्ञ कुंडात, पृथ्वीचे सर्व साप एकामागून एक येऊन पडू लागले. एका विशिष्ट मंत्राने साप स्वत: यज्ञात पोहोचत असत. लाखो सापांचा बळी दिला गेला. सापांच्या जातीचे अस्तित्व धोक्यात आले. हे पाहून नागराज तक्षक सूर्यदेवाच्या रथाला जाऊन गुंडाळी मारुन बसला. यामुळे सूर्यदेवाचा रथ हवनकुंडकडे जाऊ लागला. तक्षक नाग यांच्यासोबतच सूर्यदेव हवनकुंडात गेले तर सृष्टीचा वेग थांबला असता.

म्हणून देवतांनी जनमेजयला यज्ञ थांबवण्याची विनंती केली. पण, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केलेले हे यज्ञ थांबवायला तो तयार नव्हता. अखेर, आस्तिक मुनीच्या हस्तक्षेपाने जनमेजयने सापांचा महाविनाश करणाऱ्या यज्ञाला थांबविले आणि तक्षक नागराजचा जीव वाचला.

Why Parikshit Son Took Revenge Of His Fathers Death To Takshak Nagraj Know The Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | आयुष्यात यश मिळवायचं असेल तर गरुड पुराणातील ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते