Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची करा अशी पूजा, जीवनातील सर्व संकट होईल दूर

हिंदू धर्मात कालाष्टमीचा दिवस महादेवांचे रूप असलेल्या कालभैरवाच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात यश प्राप्त होते.

कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची करा अशी पूजा, जीवनातील सर्व संकट होईल दूर
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 3:32 PM

हिंदू धर्मात कालाष्टमीचा दिवस भगवान कालभैरवाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. कालभैरवाची उपासना केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो असे मानले जाते. कालभैरव ही रक्षणाची देवता मानले जाते. त्याची पूजा केल्याने माणसाला संरक्षण मिळते कालभैरवच्या कृपेने माणसाला जीवनात यश मिळते.

पंचांगानुसार माघ महिन्याची कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 21 जानेवारी रोजी दुपारी 12: 39 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 जानेवारी रोजी दुपारी 3: 18 मिनिटांनी संपन्न होईल. त्यामुळे माघ महिन्याची कालाष्टमी 21 जानेवारीला केली जाणार आहे कारण कालाष्टमी ची पूजा संध्याकाळी केली जाते.

कालाष्टमीच्या दिवशी अशी करा पूजा

हे सुद्धा वाचा

१. कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. २. पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी ते ठिकाण सजवा. ३. कालभैरवची मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवा. ४. कालभैरवाला गंगेच्या पाण्याने स्नान करून कालभैरवाला फुले, चंदन, कुंकू इत्यादी अर्पण करा. ५. कालभैरवच्या विविध मंत्रांचा जप करा आणि त्यांची स्तुती करा. ६. कालभैरवाला नैवेद्य दाखवा. तुम्ही नैवेद्य म्हणून फळे, मिठाई किंवा इतर नैवेद्यही ठेवू शकता. ७. शेवटी कालभैरवाची आरती करा. ८. काळया कुत्र्याला भाकरी खायला द्या कारण काळया कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानल्या जाते. ९. मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा.

काल भैरव मंत्र

ॐ क्लीं कालिकायै नमः

कालाष्टमीच्या दिवशी हे करा

कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता.

या दिवशी कालभैरवच्या मंत्राचा जप करा.

विशेषतः काळे तीळ आणि काळे हरभरे या दिवशी दान करा.

कालाष्टमीच्या दिवशी हे करू नका

कालाष्टमीच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

खोटे बोलणे टाळा आणि रागावणे टाळा. तसेच मांसाहार देखील करू नका.

कांदा, लसूण याचे सेवन करू नका.

कालाष्टमीचे महत्व

कालाष्टमीचा दिवस हा कालभैरवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात आणि जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच सर्व संकटे दूर होतात. कालाष्टमीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने जीवनात मंगल आणि सुख समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.