AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक पाणी दिनानिमित्त ‘स्वच्छमेव जयते’, स्वच्छ पाण्याचं महत्त्व जाणून घ्या; टीव्ही9 नेटवर्क आणि लिवप्योरचं अभियान

यंदाच्या जागतिक पाणी दिनानिमित्ताने टीव्ही9 नेटवर्क आणि जागतिक जलशोधक कंपनी Livpureने आरोग्यदायी राष्ट्रासाठी स्वच्छ पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांमध्ये स्वच्छ पाण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी टीव्ही9 नेटवर्क आणि Livpureने एक मोहीम हाती घेतली आहे.

जागतिक पाणी दिनानिमित्त 'स्वच्छमेव जयते', स्वच्छ पाण्याचं महत्त्व जाणून घ्या; टीव्ही9 नेटवर्क आणि लिवप्योरचं अभियान
Swachhameva Jayate Campaign Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 22, 2024 | 8:13 PM
Share

यंदाच्या जागतिक पाणी दिनानिमित्ताने टीव्ही9 नेटवर्क आणि जागतिक जलशोधक कंपनी Livpureने आरोग्यदायी राष्ट्रासाठी स्वच्छ पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांमध्ये स्वच्छ पाण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी टीव्ही9 नेटवर्क आणि Livpureने एक मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छमेव जयते या नावाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

भारत 2047पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने पूर्ण क्षमतेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे देशाने आपल्या नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. यापार्श्वभूमीवर आरोग्यदायी भारतासाठी स्वच्छ पेयजलाचं महत्त्व दुर्लक्षित करता येत नाही. कारण त्याचा संपूर्ण कल्याणावर परिणाम होत असतो.

त्यामुळेच या जागतिक पाणी दिनाच्या दिवशी TV9 नेटवर्क आणि LivePure सत्यमेव जयते या नावाच्या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ पेयजलाचं आवाहन करत आहे. पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी, पाण्याचं योग्य नियोजन करणअयासाठी आणि शारीरिक कार्यांना सुविधाजनक बनवण्यासाठी स्वच्छ पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागृती केली जाते.

सर्वांना स्वच्छ पाणी मिळावं हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. स्वच्छ पाण्याचं महत्त्व ओळखून LivePureने ग्राहकांना अधिक सुविधाजनक आणि सुलभ बनविण्याच्या हेतूने संपूर्ण देशात स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले आहे. सर्वांना स्वच्छ जीवन जगता यावं, त्यांचं आयुष्य अधिक सुलभ व्हावं यासाठी आम्ही योगदान देत आहोत. प्रत्येकाला एक आरोग्यदायी जीवनशैली जगता यावी, ती मिळावी हा आमचा हेतू आहे, असं लिवप्योरचे प्रबंधक संचालक राकेश कौल यांनी या अभियानावर बोलताना सांगितलं.

लिवप्योरची अल्लुरा वॉटर प्युरीफायर रेंज नुकतीच लॉन्च करण्यात आली होती. घरात वॉटर प्युरीफायर कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. LivePure कोणत्याही अतिरिक्त शुल्कासह 30 महिने मोफत सेवा प्रदान करत आहे. या इंडस्ट्रीत हे पहिल्यांदाच घडत आहे. देशभरातील ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिब्ध असल्याचंच यातून सिद्ध होतंय, असं कौल यांनी स्पष्ट केलं.

बुगाने सर्वांना स्वच्छ पाणी देण्याबाबतचं क्रांतीकारी पाऊल उचललं आहे. स्मार्ट वॉटर प्युरिफायरसोबत आपल्या प्रगत शुद्धिकरण तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्यात आवश्यक ते खनिज मिसळले जावेत, यावर लाइवप्योरचा भर असतो. विशेष म्हणजे वॉटर प्युरिफायर केवळ विकतच नव्हे तर भाड्यानेही दिले जात आहेत. त्यामुळे सर्वांना स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जागतिक पाणी दिनानिमित्ताने लाइवप्योर सर्वांना स्वच्छ पाणी देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट करत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. सुरक्षित आणि स्वच्छ पाणी हा मूलभूत अधिकार करण्यासाठी आपल्या सर्वांनी सोबत मिळून काम केलं पाहिजे, असं आवाहन कौल यांनी केलं.

TV9 नेटवर्कला, या परियोजनेला पाठिंबा देताना अभिमान वाटत आहे. अत्याधुनिक साधनांद्वारे फिल्टर केलेल्या सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा उपयोग करावा. त्यात आवश्यक खनिज असतं. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करावा, असा आम्ही लोकांना आग्रह करतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.