AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलच्या इतिहासातील हटके 11 विक्रम, 6 वा विक्रम वाचून आश्चर्य वाटेल!

आयपीएलमध्ये अनेक विक्रम होतात आणि मोडले जातात, पण काही विक्रम कायम स्मरणात राहतात. हा लेख आयपीएलच्या इतिहासातील 11 अशा हटके विक्रमांवर प्रकाश टाकतो जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. ग्लेन मॅक्सवेलच्या सर्वाधिक शून्यापासून ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कमीतकमी स्कोअरपर्यंत, हे अनोखे विक्रम खेळाडू आणि संघांबद्दलचे आपले मत बदलतील. हे विक्रम आयपीएलच्या अनपेक्षित बाजूचे दर्शन घडवतात.

आयपीएलच्या इतिहासातील हटके 11 विक्रम, 6 वा विक्रम वाचून आश्चर्य वाटेल!
IPLImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2026 | 6:43 PM
Share

आयपीएलमध्ये विक्रम होतात आणि विक्रम मोडले जातात. पण काीह विक्रम कायम स्मरणात राहतात. अनेक खेळाडूंसाठी तर विक्रम ही अभिमानाची गोष्ट असते. कारण त्यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात या विक्रमामुळे कोरलं जातं. पण काही विक्रम अनोखे असतात. ते कधीच तुटत नाहीत. तुटले तरी त्याची चर्चा कायम होते. कारण असे विक्रम पुन्हा पुन्हा होत नाहीत. त्यामुळेच या विक्रमांवर नेहमी बोललं जातं. आयपीएलच्या इतिहासात असे अनेक विक्रम झाले आहेत. पण लोकांना ते माहीत नाहीत. हे विक्रम ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्या खेळाडूबद्दलचं तुमचं मत पूर्णपणे बदलून जाईल, असे हे विक्रम आहेत.

सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट

क्रिकेट जगतात एखाद्या खेळाडूने आल्या आल्याच शून्यावर (डक) बाद होणं हे एखाद्या दुर्देवी स्वप्ना सारखं असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर नोंदवला गेला आहे. तो 18 वेळा शून्यावर बाद झालाय.

सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगवानपणे चेंडू टाकण्याचा विक्रम शॉन टॅटच्या नावावर आहे. त्याने 2011च्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना ताशी 157.7 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला होता.

केवळ षटकार ठोकण्याचा विक्रम

आयपीएलमध्ये काही खेळाडू अगदी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतात. पण सुनील नारायण हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने एकही रन घेतला नाही. केवळ षटकारच लगावले आहेत. म्हणजे 0,6,6 सारखा अजब विक्रम त्याने केला आहे.

सर्वाधिक झेल सोडण्याचा विक्रम

क्षेत्ररक्षण कोणत्याही संघासाठी महत्त्वाचं असतं. पण कधी कधी तेच भारी पडू शकतं. 2019च्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकाच मॅचमध्ये पाच झेल सोडले. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याच संघाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर झेल सोडले नाहीत.

सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम

डिरेल मिचेलने 2023च्या आयपीएलच्या सीजनमध्ये सनराईजर्स हैद्राबादच्या विरुद्ध सर्वाधिक 5 झेल पकडले आहेत. तर, मोहम्मद नबीने 2021च्या आयपीएल सीजनमध्ये सनराईजर्स हैद्राबादकडून मुंबई इंडियन्स विरोधात पाच झेल पकडले होते.

सर्वाधिक सामने खेळूनही मॅन ऑफ दी मॅच नाही

आपल्याला मॅन ऑफ दी मॅच मिळावं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण असा एक खेळाडू आहे, ज्याने सर्वाधिक सामने खळले आहेत. पण त्याला एकदाही मॅन ऑफ द मॅच मिळालेलं नाही. अमित मिश्राने 150 हून अधिक सामने खेळले आहेत. पण त्याला हा पुरस्कार काही मिळालेला नाही.

डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा अनोखा विक्रम प्रवीण कुमारच्या नावावर आहे. त्याने एका सामन्यात लगातार 14 चेंडू एकही रन न देता टाकले होते.

सर्वात कमी स्कोअरवर बाद होणारी टीम

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी स्कोअरवर बाद होण्याचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जातो. 2017मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या विरोधात आरसीबीने केवळ 49 धावा केल्या होत्या. 49 धावांवर आरसीबीची अख्खी टीम बाद झाली होती.

सर्वात कमी वयातील कर्णधार

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात कर्णधार होण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 22 वर्ष आणि 187 दिवसाचा असताना त्याने कर्णधार पद भूषवलं होतं. तो रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार झाला होता.

एका डावात सर्वाधिक स्टंम्पिंग

आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा स्टंम्पिंग करण्याचा विक्रम विकेट किपर एम एस धोनीच्या नावावर आहे. त्याने एकाच सामन्यात तीनवेळा स्टंम्पिंग केलं होतं.

सर्वाधिक छक्के

एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक छक्के देण्याचा विक्रमही नोंदला गेला आहे. गोलंदाज कृष्णाच्या नावावर हा विक्रम आहे. त्याने एका ओव्हरमध्ये 5 छक्के दिले होते.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....