AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Asia Cup 2025 : मैदानात हॅरिस रौफसोबत जोरदार भांडण, अभिषेक शर्मा मॅच संपल्यानंतर बोलला की, विनाकारण त्यांनी…VIDEO

Abhishek Sharma vs Haris Rauf Fight : भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंमध्ये तणाव सामान्य बाब आहे. आशिया कप 2025 मध्ये सुपर 4 च्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफ यांच्यात सुद्धा काल असाच वाद झाला. मॅच संपल्यानंतर अभिषेक शर्माने नेमकं काय घडलं? त्यावर बोलला.

IND vs PAK Asia Cup 2025 : मैदानात हॅरिस रौफसोबत जोरदार भांडण, अभिषेक शर्मा मॅच संपल्यानंतर बोलला की, विनाकारण त्यांनी...VIDEO
Abhishek Sharma vs Haris Rauf Fight
| Updated on: Sep 22, 2025 | 8:35 AM
Share

भारत-पाकिस्तान सामना आणि मैदानावर तणाव नाही, असं कसं होईल? 21 सप्टेंबरच्या संध्याकाळी दुबईत असच काही पहायला मिळालं. सुपर-4 च्या संग्रामात भारतीय इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला. अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतकं वाढलं की, दोघांना थांबवण्यासाठी अंपायर गाजी सोहेल यांना हस्तक्षेप करावा लागला. हॅरिस रौफला फक्त एकटा अभिषेक भिडला नाही,तर या वादात त्याला शुभमन गिलचा पूर्ण सपोर्ट मिळाला. अभिषेक आणि हॅरिसने आधीच परस्परांवर शब्दांचे बाण चालवायला सुरुवात केली होती. शुबमन गिलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर या वादात उडी घेतली. त्यानंतर हा वाद आणखी भडकला. तो रौफला काहीतरी बोलताना दिसला. हॅरिस रौफच्या आधी अभिषेक शर्मा आफ्रिदीला भिडला.

शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने सिक्स मारल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. पण हॅरिससोबत झालेल्या अभिषेक शर्माच्या वादाने भारत-पाकिस्तान सामन्यातील वातावरण आणखी तापलं. पाकिस्तानी गोलंदाजांविरोधात अभिषेक शर्माच फक्त तोंड चाललं नाही, तर बॅटही चालली.

अभिषेक शर्मा काय म्हणाला?

मॅच संपल्यानंतर आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा म्हणाला की, “मला वाटतं की, विनाकारण ते आमच्यावर वर्चस्व गाजवत होते. ते मला आवडलं नाही. म्हणून मी विचार केला की, बॅटनेच उत्तर देणं चांगलं आहे. मी तेचं केलं. अखेरीस टीमचा विजय या गोष्टीच प्रमाण आहे की, मी जे ठरवलं, जे मला हवं होतं, ते करण्यात मी यशस्वी ठरलो”

189.74 च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या धावा

अभिषेक शर्माने पाकिस्तान विरुद्ध सुपर-4 च्या सामन्यात फक्त 39 चेंडूत 74 धावा चोपल्या. 189.74 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये अभिषेकच्या बॅटमधून 6 चौकार आणि 5 षटकार निघाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.