AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Shami : भुवनेश्वर नंतर आता मोहम्मद शमीचा रणजीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स, टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडणार का?

Mohammed Shami : मोहम्मद शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडणार का? कारण रणजीमध्ये शमीने सुरुवातच तशी दणदणीत केली आहे. भुवनेश्वर कुमार नंतर सिलेक्शन कमिटीने मोहम्मद शमीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं एमएसके प्रसाद यांचं म्हणणं आहे.

Mohammed Shami : भुवनेश्वर नंतर आता मोहम्मद शमीचा रणजीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स, टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडणार का?
bhuvneshwar kumar-mohammed shamiImage Credit source: Reuters
| Updated on: Oct 13, 2026 | 3:48 PM
Share

बऱ्याच काळापासून टीमच्या बाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टी20 टीममध्ये पुनरामगन केलय. त्यामुळे आता मोहम्मद शमीची टीममध्ये एन्ट्री कधी होणार? अशी चर्चा सुरु झालीय. शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमबॅक बद्दल दिग्गज वारंवार आपलं मत मांडत आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी मोहम्मद शमीला टेस्ट आणि वनडे फॉर्मेटमध्ये स्थान देण्याची शिफारस केली आहे. एमएस प्रसादच्या आधी सुद्धा अनेक दिग्गजांनी शमीबद्दल आपलं मत मांडलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी20 सीरीजसाठी भुवनेश्वर कुमारचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आलाय. मागच्या दोन ते तीन आयपीएल सीजनमध्ये 45 पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमार टीम मध्ये स्थान मिळवण्याचा पूर्णपणे पात्र आहे. भुवनेश्वर कुमार नंतर सिलेक्शन कमिटीने मोहम्मद शमीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं एमएसके प्रसाद यांचं म्हणणं आहे. दिल्ली विरुद्ध चार विकेट घेऊन शमीने रणजी ट्रॉफीच्या नव्या सीजनची शानदार सुरुवात केली आहे.

“कोणी असा खेळाडू आहे ज्याने 2015, 2019 आणि 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी दमदार प्रदर्शन केलं आहे, अजूनही चांगली गोलंदाजी करतोय, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये त्याला भारतीय संघाकडून खेळताना पहायला आवडेल” असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by MOHAMMAD SHAMI (@mdshami.11)

शमी फक्त एका कारणामुळे तीन ते साडेतीन वर्ष टीमच्या बाहेर

“जेव्हा कधी जसप्रीत बुमराह टीमच्या बाहेर जातो, तेव्हा भारतीय टीमला त्याच्या अनुभवाची कमतरता जाणवते. अशावेळी शमीसारखा वेगवान गोलंदाज टीममध्ये असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो” असं प्रसाद यांचं म्हणणं आहे. आता निवडकर्ते न्यूझीलंड आणि आगामी सीरीजसाठी शमीची टीममध्ये निवड करतात का? हे लवकरच समजेल. मोहम्मद शमी वारंवार दमदार प्रदर्शन करुन बीसीसीआयचे दरवाजे ठोठावत आहे. पण वय या एका कारणामुळे गेली तीन-साडेतीन वर्ष तो टीमच्या बाहेर आहे.

Follow Us
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?