AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 संपताच या 4 मोठ्या खेळाडूंचे सुरु होऊ शकतात बुरे दिन, यात एक भारताचा प्लेयर

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपल्यानंतर अनेक खेळाडूंच करिअर संपू शकतं. त्यांची ही शेवटची टुर्नामेंट ठरु शकते. काही खेळाडूंना कॅप्टनशिप गमवावी लागू शकते. या टुर्नामेंटनंतर आठ पैकी चार टीम्सच्या कॅप्टन्सना कर्णधार पदावरुन हटवलं जाऊ शकतं.

Champions Trophy 2025 संपताच या 4 मोठ्या खेळाडूंचे सुरु होऊ शकतात बुरे दिन, यात एक भारताचा प्लेयर
Champions Trophy 2025 Image Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2025 | 7:49 AM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या आठ टीम्सपैकी निम्म्या टीम्सच्या कॅप्टन्सना येणाऱ्या दिवसात वाईट काळ पहावा लागू शकतो. चार टीम्सच्या कॅप्टन्सचा मोठा फटका बसू शकतो. त्यांचं कर्णधारपद धोक्यात आहे. त्यांना कॅप्टनशिप गमवावी लागू शकते. कदाचित त्यांना टीम बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवला जाऊ शकतो. यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मापासून पाकिस्तानी कॅप्टन मोहम्मद रिजवानच सुद्धा नाव आहे. असं होण्यामागे काय कारण आहे? ते जाणून घ्या.

पहिला खेळाडू

पाकिस्तान टीमच चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आलय. तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही ठिकाणी पाकिस्तानी टीमने खराब प्रदर्शन केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आधी न्यूझीलंड आणि नंतर भारताकडून पराभूत झाल्यावर पाच दिवसांच्या आत पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान देश आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर्स टीममध्ये बदल करण्याची मागणी करत आहेत. यात सर्वात पहिली Action कॅप्टन मोहम्मद रिजवानवर होऊ शकते.

दुसरा खेळाडू

बांग्लादेशची टीम सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेली आहे. बांग्लादेश टीमच नेतृत्व नजमुल हुसैन शान्तोकडे आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आधी भारत आणि न्यूझीलंडने बांग्लादेशला पराभूत केलं. टीमच्या खराब प्रदर्शनानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड नजमुल हुसैन शान्तोला कर्णधारपदावरुन हटवू शकतो.

तिसरा खेळाडू

जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली अलीकडेच इंग्लंडने भारताविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका 4-1 ने गमावली होती. त्यानंतर भारताने इंग्लंडवर वनडे सीरीजमध्ये 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. त्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 351 धावा बनवूनही इंग्लंडचा पराभव झाला. अफगाणिस्तानच्या टीमने सुद्धा इंग्लंडला हरवलं. इंग्लंडच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. त्यामुळे आयसीसी स्पर्धा संपल्यानंतर जॉस बटलरला कॅप्टनशिप गमावून किंमत चुकवावी लागू शकते.

रोहित शर्मा बाबत असा निर्णय का होईल?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच शानदार प्रदर्शन कायम आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेश त्यानंतर पाकिस्तानला धूळ चारुन टीम इंडियाने दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता पुढे काय होणार, हे वेळच ठरवेल. पण रोहित शर्माच्या करियरबद्दल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोठा निर्णय होऊ शकतो. कारण बीसीसीआयची आतापासूनच वनडे वर्ल्ड कप 2027 साठी टीम तयार करण्याची योजना आहे. रोहित शर्मा आता 37 वर्षांचा असून एप्रिल महिन्यात तो वयाच्या 38 व्या वर्षात पदार्पण करेल. रोहितच्या कॅप्टनशिपसह त्याच्या फलंदाजीकडे पाहिलं जाईल. त्याने बांग्लादेश विरुद्ध 41 आणि पाकिस्तान विरुद्ध 20 धावा केल्या. आता पुढच्या सामन्यात रोहित त्याच्या बॅटने काय कमाल करतो ते दिसून येईलच. रोहितच्या बाबतीत अजूनही 50-50 आहे. पण रोहित शर्माला धावा बनवाव्याच लागतील.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.