Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं, इतक्या जवळ पोहोचून.. पराभव मनाला लागला VIDEO
Vaibhav Sooryavanshi : उद्दिष्ट्याच्या जवळ पोहोचल्यानंतर अचानक ती गोष्ट लांब गेली, तर मनाला खूप लागतं. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. काल राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर 2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. राजस्थानच्या टीमने यंदाच्या सीजनमध्ये कमाल केली ती एका खेळाडूमुळे वैभव सूर्यवंशी.

Vaibhav Sooryavanshi Emotional : आयपीएल 2026 चा सीजन कुठल्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने यंदाच्या सीजनमध्ये खणखणीत फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहसह भल्या-भल्या दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढली. राजस्थान रॉयल्सच्या बहुतांश सामन्यात वैभवने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण काल चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा हा प्रवास थांबला. क्वालिफायर-2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 7 विकेटने हरवून आयपीएल 2026 सीजनच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यातही राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने तुफान फलंदाजी केली. त्याच्या 96 धावांच्या इनिंगच्या बळावर राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी 215 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं.
गुजरात टायटन्सने हे टार्गेट अगदी सहज पार केलं. 8 चेंडू आणि 7 विकेट राखून गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. गुजरातचा फलंदाज राहुल तेवतियाने विनिंग चौकार मारताच राजस्थानचा आयपीएल 2026 मधील प्रवास संपुष्टात आला. राजस्थान रॉयल्सच्या टीमने हा सामना गमावताच कॅमेरा वैभव सूर्यवंशीकडे गेला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. सीनियर खेळाडू रवींद्र जाडेजा वैभवला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. बराचवेळ दोघांमध्ये बोलणं झालं. त्यानंतर वैभव सूर्यवंशी डगआऊटमध्ये निघून गेला. त्याने गुजरात टायन्सच्या खेळाडूंशी हस्तांदोलनही केलं नाही. खरंतर ही खिलाडूवृत्ती नाही. वैभव डगआउटमध्ये जाऊन बसला. त्याने टोपीने आपला चेहरा लपवला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचं कॅमेऱ्याने टिपलं.
Out of the park, a win in the bag 👊@gujarat_titans reach the final in a sublime fashion 🤩💙
Scorecard ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/zM5Zh9nUc7
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
त्याचा स्ट्राइक रेट 237.31
यंदाच्या सीजनमध्ये वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी कमाल कामगिरी केली. त्याने 776 धावा केल्या. 48.5 च्या सरासरीने त्याने फलंदाजी केली. त्याने सर्वाधिक 72 सिक्स मारले. त्याचा स्ट्राइक रेट 237.31 चा होता. इतकी शानदार कामगिरी केल्यानंतर जर एखाद्या खेळाडूची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली नाही, तर दु:ख होणं स्वाभाविक आहे. वैभव सूर्यवंशी मागच्या चार सामन्यात तीनवेळा निराश झाला. त्याची तीन शतकं हुकली. लखनऊ विरुद्ध तो 93 रन्सवर आऊट झाला. हैदराबाद विरुद्ध 97 आणि गुजरात विरुद्ध 96 धावांवर. म्हणजे थोडक्यात त्याची तीन शतकं हुकली.