AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup Trophy : रोहितच्या हातातील वर्ल्डकप ट्रॉफीचं किती आहे वजन ? सोन्याचा किंवा चांदीचा कप कधी मिळतो माहीत आहे का ?

T20 World Cup Trophy : T-20 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला असून आता सर्वांच्या नजरा भारतीय खेळाडूंच्या हातात असलेल्या चांदीच्या ट्रॉफीकडे लागल्या आहेत. या ट्रॉफीबद्दल खास गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ?

T20 World Cup Trophy : रोहितच्या हातातील वर्ल्डकप ट्रॉफीचं किती आहे वजन ? सोन्याचा किंवा चांदीचा कप कधी मिळतो माहीत आहे का ?
| Updated on: Jul 04, 2024 | 2:16 PM
Share

गुरुवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघ T-20 वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन दिल्लीत पोहोचताच सर्वत्र जल्लोष झाला. इंडिया-इंडियाचे नारे दुमदुमू येऊ लागले. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन विमानतळाबाहेर आला आणि संपूर्ण टीम उत्साहात दिसली. भारतीय संघाने मोठ्या परिश्रमाने जिंकलेल्या चांदीच्या विश्वचषक ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तुम्हीही आत्तापर्यंत ही ट्रॉफी अनेकदा पाहिली असेल. पण, ही ट्रॉफी सिल्व्हर कलरची का आहे, असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का ? कारण अनेकदा वर्ल्ड कपची ट्रॉफी गोल्डन कलरची असते. मग यावेळेसचा या ट्रॉफीचा रंग वेगळा का, त्यामागचं लॉजिक काय ? आणि ट्रॉफी कधी चांदीची आणि कधी सोन्याची का ठेवली जाते ते जाणून घेऊया.

काय आहे लॉजिक ?

खरंतर, वर्ल्डकप ट्रॉफीच्या रंगातील महत्त्वाचा फरक म्हणजे सोने आणि चांदी. T-20 विश्वचषक ट्रॉफीमध्ये सोन्याचा वापर केला जात नाही आणि ही ट्रॉफी चांदी आणि रोडियमची बनलेली आहे. तर वन-डे वर्ल्डकपची ट्रॉफी सोने आणि चांदीची बनलेली आहे, ज्यामुळे तिचा रंग सोनेरी असतो. म्हणूनच 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये मिळालेली ट्रॉफी सोनेरी असते. मात्र टी-20 वर्ल्डकपमध्ये जी ट्रॉफी मिळते ती चंदेरी रंगाची असते.

टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीमध्ये काय खास आहे ?

टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी चांदी आणि रोडियमच्या मिश्रणातून बनवण्यात आली आहे. ट्रॉफीचे वजन सुमारे 7 किलो असून त्याची उंची सुमारे 51 सेमी इतकी आहे.

कोणाकडे राहणार ट्रॉफी ?

वर्ल्ड कप मुख्य ट्रॉफी ही त्या संघातील खेळाडूंना दिली जात नाही. मूळ ट्रॉफी IIC कडे राहते आणि त्याची प्रतिकृती असलेली ट्रॉफी संघाला दिली जाते. संघातील खेळाडू ही ट्रॉफी स्वतःकडे ठेवू शकत नाहीत , तर ती क्रिकेट बोर्डाकडे ठेवली जाते. यावेळेस भारताने विश्वचषक जिंकला आहे, त्यामुळे आता ही ट्रॉफी बीसीसीआयकडे ठेवण्यात येणार आहे.

टीम इंडियाने 29 जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता. या विजयासह भारताने ब्रिजटाऊन (बार्बाडोस) येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्डकपवर नाव कोरलं. या अप्रतिम विजयानंतर टीम गुरुवारी सकाळी दिल्लीला पोहोचली आणि काही काळ हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये उतरली. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी विजेत्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज संध्याकाळी मुंबईत विजयी संघाची ओपन बसमधून परेड निघणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.