Virat Kohli : पैशांवरुन विराट कोहलीला वेस्ट इंडिजच्या एका मोठ्या खेळाडूने टोमणा मारला का?
Virat Kohli : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या मुद्यावर वेस्टइंडीजच्या ऑलराऊंडर खेळाडूने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्टइंडीजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने विराट कोहलीच्या स्टेटमेंटवर आपल मत मांडलय.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने IPL 2025 दरम्यान तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करुन सर्वांना धक्का दिला. पहिल्या आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटने कसोटी क्रिकेटबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन एक नवीन वाद सुरु झालाय. RCB चॅम्पियन बनवल्यानंतर विराट कोहली खूप भावनिक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने आपल्या आयुष्यातील एक खास क्षण असल्याच सांगितलं. पण त्यानंतर विराट पुढे जे बोलला, त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. “आरसीबी पहिल्यांदा चॅम्पियन बनणं माझ्यासाठी विशेष आहे. पण, तरीही हे टेस्ट क्रिकेटपेक्षा पाच लेव्हल खाली आहे. मला टेस्ट खेळणं सर्वात जास्त आवडतं” असं विराट म्हणाला. यावर वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलने उत्तर दिलं आहे.
वेस्टइंडीजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने विराट कोहलीच्या स्टेटमेंटवर आपल मत मांडलय. “विराट कोहलीसारखा प्लेयर यासाठी टेस्ट क्रिकेटला इतकं महत्त्व देतो, कारण तो भारतासारख्या देशाकडून खेळतो. तिथे क्रिकेट बोर्डाकडून आपल्या खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो”
दाखवण्यासाठी काही जास्त नसतं
एका इंटरव्यूमध्ये आंद्रे रसेल म्हणाला की, “भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या देशात टेस्ट खेळाडूंची भरपूर काळजी घेतली जाते. वेस्ट इंडिज सारख्या देशापेक्षा हे वेगळं आहे. वरील तीन देशातील खेळाडूंना टेस्ट खेळण्यासाठी शानदार सेंट्रल कॉन्ट्रॅक्टस मिळतात. सहाजिक अशी संधी मिळाल्यावर त्यांना खेळायला आवडेल. पण आमचे खेळाडू 50 किंवा 100 कसोटी सामने खेळले, तर निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही जास्त नसतं”
एक टेस्ट मॅच नंतर टीम बाहेर
आंद्रे रसेलने 2010 साली वेस्टइंडीजकडून टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. त्यावेळी त्याला फक्त एक टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळालेली. त्यानंतर त्याला थेट टेस्ट टीमबाहेर करण्यात आलं. कारण बोर्डाला असं वाटायच की रसेल व्हाइट बॉलसाठी म्हणजे वनडे, टी 20 साठी फिट आहे.
आंद्रे रसेल म्हणाला की, “टेस्ट क्रिकेट माझ्या करियरचा महत्त्वाचा भाग होता. पण काही लोकांनी मला यापासून दूर ठेवलं. मला या बद्दल पश्चाताप नाहीय” आंद्रे रसेल 15 नोव्हेंबर 2010 साली श्रीलंकेविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच खेळला होता. त्या सामन्यात त्याने फक्त दोन धावा केलेल्या. गोलंदाजीत फक्त एक विकेट मिळालेला. त्यानंतर त्याला पुन्हा कधी टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
