विराट अनुष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन, वाचा विराट अनुष्काची डोळे दिपवणारी ‘लक्ष्मी’!

विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झालंय. ट्विट करुन विराटने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

विराट अनुष्काच्या घरी 'लक्ष्मी'चे आगमन, वाचा विराट अनुष्काची डोळे दिपवणारी 'लक्ष्मी'!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालंय. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झालंय. ट्विट करुन विराटने आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. विराट आणि अनुष्का दोघेही त्यांच्या क्षेत्रात यशोशिखरावर आहेत. (Anuual Income of Virat Kohli And Anushka Sharma)

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अनुसार 2019 या वर्षात तिने 28.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. पाठीमागच्या वर्षी त्याने 175 कोटी रुपयांची कमाई केली.

अनुष्का शर्माला 2019 या वर्षी फॉर्च्यून इंडियाच्या टॉप 50 मध्ये 39 रँक मिळाली होती. अनुष्का शर्मा अँक्टींगबरोबरच फिल्म्सही प्रोड्यस करते. तिचा भाऊ करणेश शर्माबरोबर तिने 2014 ला क्लीन स्लेट नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केलीय. आताच्याच पाताल लोक या वेबसिरीजचं दिग्दर्शन अनुष्काने केलं होतं. ही सिरीज चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

जगातला सगळ्यात महागडा क्रिकेटर विराट कोहली…!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातला सगळ्यात महागडा क्रिकेटर आहे. 2019 ला त्याने एकाच वर्षात 175 कोटी कमावले. लिओनाल मेस्सीची एका वर्षाची कमाई 889 कोटी रुपये आहे. तसंच जाहिरातींच्या बाबतीतही इतर स्टारपेक्षा विराट महागडा आहे. अनेक कंपन्यांच्या जाहिरातीसाठी त्याने करोडो रुपये घेतले आहेत.

विराट कोहली एका दिवसाच्या शूटिंगचे 4.5 ते 5 कोटी रुपये घेतो. ऑडी, प्यूमा, मान्यवार, एमआरएफ टायर्स, फिलिक्स, सन फार्मा, जियोनी, हिरो मोटर्स, या आणि अशा कितीतरी बड्या कंपन्यांसोबत विराटने जाहिराती केल्या आहेत. ज्याच्या हदल्यात त्याने करोडो रुपये कमावले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार विराटची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. दिवसेंदिवस विराट यशाचा आलेख चढतो आहे. साहजिकच दरदिनी त्याच्या संपत्तीत भरमसाठ वाढ होते आहे. विराटच्याच पावलावर पाऊट टाकत अनुष्कानेही आपल्या सिनेक्षेत्रात पाय घट्ट रोवले आहेत.

विराट-अनुष्काची गुडन्यूज

“आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे” असे ट्विट विराट कोहलीने केले आहे.

(Anuual Income of Virat Kohli And Anushka Sharma)

संबंधित बातम्या

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

Published On - 7:29 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI