IND vs PAK Live Streaming : भारत-पाकिस्तान सामन्याचे या अॅप्सवर लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या सामन्याचा वेळ..
IND vs PAK : आज भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगतोय. मात्र, भारतातून या सामन्याला जोरदार विरोध होत आहे. दुबईत हा सामना रंगणार आहे. भारतावरील पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान संघ एकमेंकांच्या समोर येणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना रविवारी म्हणजेच आज 14 सप्टेंबर रोजी दुबई येथे रंगणार आहे. या सामन्याच्या अगोदर मोठ्या घडामोडींना वेग आला. भारतीय संघातील काही खेळाडू हे सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशी लोकांची भावना आहे. कारण काही दिवसांपूर्वीच झालेल्या हल्ल्यात अनेक भारतीयांचे जीव गेले. हेच नाही तर हिंदू पर्यटकांना धर्म विचारून पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या ह्ल्लाला काही महिने पूर्ण होत नाहीत तोवरच भारतीय संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
भारत पाकिस्तान सामना दुबईत खेळवला जातोय. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8 वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय वेळेनुसार, टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होईल. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ समोरासमोर येतील. आशिया कप 2025 चे प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. यासोबतच हा सामना आपण सोनी स्पोर्ट्स 1, सोनी स्पोर्ट्स 3 हिंदी, सोनी स्पोर्ट्स 4, सोनी स्पोर्ट्स 5 वर पाहू शकता.
भारत विरूद्ध पाकिस्तान सामना आपण लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर देखील बघू शकता. सोनी लिव्ह व्यतिरिक्त भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर देखील मिळेल. हा सामना लाईव्ह बघणाऱ्यांना लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी 49 रुपये सबस्क्रिप्शन फी भरावी लागेल. भारतातून जरी या सामन्याल विरोध होताना दिसत असला तरीही लोकांमध्ये मोठी क्रेझ या सामन्याबद्दल आहे.
फक्त हेच नाही तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहू शकतात. डीडी फ्री डिश फक्त तेच सामने प्रसारित करेल ज्या सामन्यात भारतीय संघ खेळत आहे. पूर्ण आशिया कप 2025 चे सामने डीडी फ्री डिशवर दिसणार नाहीत. थोडक्यात काय तर आपण फ्रीमध्ये भारतीय संघाचा सामना डीडी फ्री डिशवर पाहू शकता. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सामन्याबाबत लोकांच्या वेगळ्या भावना आहेत.
