Aus vs Ind, 3rd Test | पंत-पुजाराची कमाल, 72 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

जारा आणि पंतने चौथ्या विकेटसाठी 148 धावांची निर्णायक आणि महत्वपूर्ण भागीदारी केली.

Aus vs Ind, 3rd Test | पंत-पुजाराची कमाल, 72 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात तिसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सामना अंतिम टप्पात आहे. हा सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने जात आहे. टीम इंडियाला आणखी 100 धावांची आवश्यकता आहे. हनुमा विहारी आणि अश्विन खेळत आहेत. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) शानदार फंलदाजी केली. यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र हे दोघे बाद झाले. दरम्यान या जोडीने 72 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. (aus vs ind 3rd test Pant and Pujara breaks 72 year old record of Rusi Modi and Vijay Hazare)

काय आहे विक्रम ?

पुजारा आणि पंतने चौथ्या विकेटसाठी 148 धावांची निर्णायक आणि महत्वपूर्ण भागीदारी केली. पंतचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले. पंत 97 धावांवर बाद झाला. पंतने 118 चेंडूत 12 चौकार आणि 3 सिक्ससह शानदार 97 धावा केल्या. तर पुजाराने 205 चेंडूत 12 चौकारांसह 77 धावांची झुंजार खेळी केली. या जोडीने 72 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. रुसी मोदी आणि विजय हजारे या टीम इंडियाच्या माजी फंलदाजांच्या जोडीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

सविस्तर जाणून घेऊयात..

टीम इंडियाने 102 धावांवर 3 विकेट्स गमावले. यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र यानंतर पंत-पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 148 धावांची शानदार भागीदारी केली. ही भागीदारी कसोटीत चौथ्या डावात चौथ्या विकेटसाठी टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली. याआधी टीम इंडियाकडून विजय हजारे आणि रुसी मोदी या जोडीने 139 धावांची भागीदारी केली होती. वेस्ट इंडियविरोधात 1948-49 मध्ये ही भागीदारी करण्यात आली होती.

चौथी कसोटी 15 जानेवारीपासून

दरम्यान आता टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप होत आला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 15 जानेवारीला खेळ्या येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

INDvsAUS : 23 वर्षीय ऋषभ पंतने इतिहास रचला, ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर

(aus vs ind 3rd test Pant and Pujara breaks 72 year old record of Rusi Modi and Vijay Hazare)

Published On - 12:32 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI