Australia Tour South Africa 2021 | कोरोनाच्या नव्या अवताराचा फटका, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलला

आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Australia Tour South Africa 2021 | कोरोनाच्या नव्या अवताराचा फटका, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा पुढे ढकलला
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम

कॅनबेरा : कोरोनाच्या नव्या अवताराचा फटका क्रिकेट (Corona New Strain) क्षेत्राला बसला आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (Australia Tour South Africa 2021) पुढे ढकलण्यात आला आहे. खेळाडूंना कोणतीही बाधा होऊ नये, याचा विचार करत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. ट्विट करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA)याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या शेवटी आफ्रिका दौऱ्यावर जाणार होता. (Australia proposed tour of South Africa has been postponed due to the coronavirus pandemic)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या संसर्ग वाढला आहे. अशात आफ्रिका दौऱ्यावर जाणं हे धोकादायक ठरलं असतं. आम्ही स्थानिक प्रशासनासोबत याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हितासाठी हा निर्णय घेतला, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी दिली.

कोरोनाचा क्रिकेटवरील परिणाम

दरम्यान कोरोनामुळे याआधी क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याआधी कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये इंग्लंडच्या श्रीलंका दौरा स्थगित करावा लागला होता. तसेच आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन 6 महिन्यांनंतर थेट यूएईमध्ये करण्यात आलं. इतकच नाही तर अनेक क्रिकेटपटूंना कोरोनाची लागणही झाली. यामध्ये पाकिस्तानच्या 10 पेक्षा अधिक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली श्रीलंका दौऱ्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह सापडला. वेस्ट इंडिजचे होप बंधू नुकतेच पॉझिटिव्ह आढळले. तर भारतीय माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा अफ्रिका दौरा रद्द झाला असला तरी दुसरा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 22 फेब्रुवारी, ख्राईस्टचर्च

दुसरा सामना, 25 फेब्रुवारी, डुनेडिन

तिसरा सामना, 3 मार्च, वेलिंग्टन

चौथा सामना, 5 मार्च, ऑकलंड

पाचवा सामना, 7 मार्च, माउंट मांगुनई

न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, एश्टन एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडरमोट, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर संघा, डी आर्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एंड्रयू टाय आणि एडम झॅम्पा.

संबंधित बातम्या :

Corona | ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार

Australia Tour South Africa 2021 | भारताविरुद्धच्या कामगिरीचा फटका, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

(Australia proposed tour of South Africa has been postponed due to the coronavirus pandemic)

Published On - 7:24 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI