Corona | ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार

आणखी 2 क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:29 PM, 27 Jan 2021
Corona | 'या' धडाकेबाज क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण, मोठ्या स्पर्धेला मुकणार

मुंबई : वेस्टइंडिजच्या 2 क्रिकेटपटूना कोरोनाची लागण झाली आहे. सलामीवीर फलंदाज शाई होप (Shai Hope) आणि काईल होप (Kyle Hope) या होप बंधूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बारबडोस क्रिकेटने याबाबतची माहिती दिली आहे. दोन्ही खेळाडूंची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या दोघांना स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार या आयसोलेट करण्यात येणार आहे. (west indies cricketer shai hope and kyle hope corona positive)

होप बंधूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या दोघांना (CG Insurance Super 50 Cup) स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी बारबाडोस संघात विकेटकीपर टेविन वालकॉट आणि जाचारी मॅकेसी यांना संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेंचं आयोजन 7 ते 27 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. शाई होपने एकूण 34 कसोटी, 78 वनडे आणि 13 टी सामन्यांमध्ये वेस्टइंडिजचे नेतृत्व केले आहे. तर काईलने एकूण 5 टेस्ट आणि 7 वनडे मॅचेस खेळल्या आहेत.

क्रिकेटपासून दूर

कॅरेबियन प्रीमीयर लीगनंतर शाई क्रिकेटपासून लांब आहे. सातत्याने कसोटीमध्ये अयशस्वी ठरल्याने शाईला न्यूझीलंड दौऱ्यासाठीही संधी देण्यात आली नव्हती. शाई टी 20 स्पेशालिस्ट फलंदाज आहे. मात्र त्यानंतरही त्याला वगळण्यात आले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र यानंतरही शाईला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. तर काईल होपने त्रिनिदाद एंड टोबेगोविरुद्ध 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू मोईल अलीलाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानचे 10 पेक्षा अधिक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तर काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.

संबंधित बातम्या :

Moeen Ali | इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग

Chetan Chauhan Dies | माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

एकाच सामन्याद्वारे वेस्‍ट इंडिजच्या 6 खेळाडूंचे पदार्पण, 42 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

(west indies cricketer shai hope and kyle hope corona positive)