AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी गौतम गंभीरकडून रहाणेला यशाचा मंत्र

विराटच्या अनुपस्थितीत उर्वरित 3 कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. यामुळे टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने रहाणेला महत्वपूर्ण सल्ला दिला आहे.

Australia vs India 2nd Test | बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी गौतम गंभीरकडून रहाणेला यशाचा मंत्र
| Updated on: Dec 21, 2020 | 7:06 PM
Share

मेलबर्न : टीम इंडिया पहिला पराभव विसरुन दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी (Australia vs India 2nd Test) सामन्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाकडून पहिल्या सामन्यात संघ निवडीपासून ते फलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा बऱ्याच बाबतीत चुका झाल्या. या सर्व चुकातून टीम इंडियाने धडा घेतला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी संघात मोठे बदल करण्यात येणार आहेत. तसेच विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणामुळे भारतात परतत आहे. यामुळे उर्वरित 3 कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) रहाणेला यशस्वी मंत्र दिला आहे. australia vs india 2nd test gautam gambhir give Success mantra to ajinkya rahane from to win Boxing Day Test

गंभीरचा रहाणेला सल्ला

“चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्यने केएल राहुल किंवा शुभमन गिलला संधी न देता स्वत: चौथ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी यावे. यावरुन तो पुढे येत संघाला दिशा देतोय, असे संकेत मिळतील. रहाणेने स्वत: जबाबदारी घ्यायला हवी”, असं गंभीर म्हणाला. गंभीर इसपीएन क्रिकइंफोसोबत बोलत होता.

पाच गोलंदाजांसह मैदानात उतरावं

गंभीरने रहाणेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासह आणखी एक सल्ला दिला आहे. “रहाणेने अंतिम अकरा खेळाडूंमध्ये एकूण 5 गोलंदाजांना संधी द्यायला हवी. ऑस्ट्रेलियाचा संघ फार मजबूत नाही. जर दुसऱ्या सामन्यात खेळला नाही, तर ऑस्ट्रेलिया नक्कीच कमकुवत ठरेल. टीम इंडियाकडे इशांत शर्मासारखा अनुभवी गोलंदाज नाहीये. त्यामुळे रहाणेने दुसऱ्या सामन्यात 5 गोलंदाजांसह मैदानात उतरावे. यामुळे तुम्ही केवळ सामनाच नाही तर मालिका जिंकण्याचे हिशोबाने नियोजन करताय, असा संदेश जाईल”. असा सल्ला गंभीरने रहाणेला दिला आहे.

टॉम मूडीचा रहाणेला सल्ला

“अजिंक्य यशस्वी होणार की नाही, हे सर्वस्वी टीम मॅनेजमेंटवर अवलंबून असेल. टीम मॅनेजमेंटने रहाणेला साथ द्यायला हवी. रहाणे एक क्लासिक प्लेअर आहे. मात्र रहाणेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतत्वाचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे रहाणेला योग्य ती मदत करण्याची जबाबदारी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची असेल. शास्त्रीने जर आपली भूमिका चोखपणे पार पाडली, तर निश्चितच रहाणेवर असलेला नेतृत्वाचा दबाव काही प्रमाणात कमी होईल. टीम मॅनेजमेटंसह संघातील अनुभवी खेळाडूंनीही रहाणेला साथ द्यायला हवी. कसोटी सामन्यात निर्णायक क्षणी तुम्ही बुद्धीमान असल्याचं दाखवून द्यायला हवं”, असं ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर खेळाडू टॉम मूडी म्हणाले.

संबंधित बातम्या :

Australia vs India | “विराट आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती टीम इंडियासाठी नुकसानकारक”

Australia vs India Test | मोबाईल बंद ठेवा, बाहेरील चर्चांकडे दुर्लक्ष करा, मोहम्मद कैफचा टीम इंडियाला सल्ला

australia vs india 2nd test gautam gambhir give Success mantra to ajinkya rahane from to win Boxing Day Test

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.