Thailand Open | सायना नेहवालला कोरोनाची लागण, थायलंडमधील तिसरा रिपोर्ट पॉझिटीव्ह

भारतीय बॅटमिंटन स्टार सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली आहे.

Thailand Open | सायना नेहवालला कोरोनाची लागण, थायलंडमधील तिसरा रिपोर्ट पॉझिटीव्ह

बँकॉक : भारतीय बॅटमिंटन स्टार सायना नेहवालला (Saina Nehwal Tested Positive For COVID-19) कोरोनाची लागण झाली आहे. सायना व्यतिरिक्त आणखी एक शटलर एचएस प्रणॉयचा (HS Prannoy) कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. हो दोघेही थायलंड ओपनमध्ये (Thailand Open) गेले होते. जेव्हा ते संपूर्ण टीमसह थायलंडला गेले तेव्हा त्यांना कोरोना नव्हता. तिथे पोहोचल्यावर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली होती तेव्हा त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतरच त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली होती (Saina Nehwal Tested Positive For COVID-19).

सायना नेहवाल आणि प्रणॉय यांना BWF-100 बॅटमिंटन टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हायचं होतं. या स्पर्धेची सुरुवात 12 जानेवारीपासून जाली. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सायना आमि प्रणॉय दोघांनाही स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

तसेच, सायना नेहवालचा पती पी. कश्यपला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे ब्रेक लागल्यानंतर BWF-100 बॅटमिंटनची पहिली स्पर्धा आहे. ज्याच्या माध्यमातून सायना आणि प्रणॉय आपल्या टीमच्या इतर सदस्यांसोबत कोर्टवर उतरणार होते. थायलंड ओपनमध्ये एकूण 12 भारतीय शटलर सहभागी होणार होते. यामध्ये पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत, चिराग सेठ्टी आणि सौरभ वर्मा यांच्यासारखे बडे खेळाडू होते.

सायनाने कोरोना चाचणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला

सायना नेहवालने बँकॉकमध्ये झालेल्या तिसऱ्या कोरोना चाचणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या चाचण्या 11 जानेवारीला झाल्या होत्या.

थायलंडमध्ये सुरु असलेल्या टुर्नामेंटमध्ये सायना आणि प्रणॉय भारताचे सर्वात प्रबळ दावेदार होते. सोबतच ही स्पर्धा ऑलिंपिकच्या तयारींसाठी महत्त्वाची होती.

Saina Nehwal Tested Positive For COVID-19

संबंधित बातम्या :

ना शमी, ना उमेश यादव, आता बुमराहचीही कमी, भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण सांभाळणार?

भारताला अजून एक धक्का, जाडेजानंतर हनुमा विहारी चौथ्या टेस्टला मुकणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI