न्यूझीलंड दौऱ्यासाठी संजू सॅमसन; पृथ्वी शॉला संधी, धडाकेबाज सलामीवीर बाहेर

येत्या 24 जानेवारीपासून भारतीय संघा न्यूजीलंड दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान, भारतीय संघ न्यूजीलंड विरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 वनडे आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:26 PM, 21 Jan 2020
न्यूझीलंड दौऱ्यासाठी संजू सॅमसन; पृथ्वी शॉला संधी, धडाकेबाज सलामीवीर बाहेर

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूजीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय संघ जाहीर केला. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या जागी यष्टीरक्षक संजू सॅमसनला टी-20 संघात घेण्यात आलं आहे. तर, पृथ्वी शॉलाही वनडे संघात स्थान मिळालं आहे. सध्या बीसीसीआयकडून कसोटी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही (Team India for New Zealand tour).

टीम इंडिया 24 जानेवारीपासून न्यूजीलंड दौऱ्य़ावर 

येत्या 24 जानेवारीपासून भारतीय संघ न्यूजीलंड दौऱ्यावर असणार आहे. यादरम्यान, भारतीय संघ न्यूजीलंड विरुद्ध 5 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.

न्यूजीलंड दौऱ्याला टी-20 सामन्यांनी सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील आणि मग कसोटी सामने होतील. भारतीय संघ 5 ते 11 फेब्रुवारीपर्यंत न्यूजीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळेल. त्यानंतर भारत आणि न्यूजीलंडमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जातील. हे कसोटी सामने 21 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत खेळवले जातील.

टी-20 : भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (याष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर.

एकदिवसीय सामने : भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केदार जाधव.

न्यूजीलंड दौरा : टी-20 वेळापत्रक

1. पहिला टी-20 सामना : ऑकलँड – 24 जानेवारी

2. दूसरा टी-20 सामना : ऑकलँड – 26 जानेवारी

3. तिसरा टी-20 सामना : हेमिल्टन – 29 जानेवारी

4. चौथा टी-20 सामना : वेलिंग्टन – 31 जानेवारी

5. पाचवा टी-20 सामना : माउंट माउंगानुई – 2 फेब्रुवारी

 

न्यूजीलंड दौरा : एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

1. पहिला वनडे सामना : हेमिल्टन – 5 फेब्रुवारी

2. दुसरा वनडे सामना : ऑकलँड – 8 फेब्रुवारी

3. तिसरा वनडे सामना : माउंट माउंगानुई – 11 फेब्रुवारी

 

न्यूजीलंड दौरा : कसोटी सामने वेळापत्रक

1. पहिला कसोटी सामना : वेलिंग्टन – 21 ते 25 फेब्रुवारी

2. दुसरा कसोटी सामना : क्राइस्टचर्च – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च

Team India for New Zealand tour